रायपूरच्या शहीद वीर नारायण सिंग आंतरराष्ट्रीय स्टेडिअमवर शनिवारी (दि. 21 जानेवारी) भारत विरुद्ध न्यूझीलंड संघातील दुसरा वनडे सामना पार पडला. या सामन्यात भारतीय संघाने न्यूझीलंडला मोठी धावसंख्या करण्यापासून रोखले. महत्त्वाचं म्हणजे, या सामन्यात रोहित शर्मा याने कर्णधार म्हणून खास विक्रम स्वत:च्या नावावर नोंदवला आहे. तो अशी कामगिरी करणारा आठवा भारतीय कर्णधार बनला.
या सामन्यात भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय घेतला होता. यावेळी न्यूझीलंडने प्रथम फलंदाजी करताना 34.3 षटकात सर्वच्या सर्व विकेट्स गमावत 108 धावा केल्या होत्या. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून रोहित शर्मा आणि शुबमन गिल यांनी डावाची सुरुवात केली. यावेळी रोहित शर्मा याने गिलसोबत पहिल्या विकेटसाठी 72 धावांचे योगदान दिले. यामध्ये त्याच्या अर्धशतकाचेही योगदान होते.
रोहितचा विक्रम
सामन्यादरम्यान रोहितने दहाव्या षटकाच्या चौथ्या चेंडूवर खणखणीत षटकार खेचत 37 धावा केल्या. यातील 32 धावांचा आकडा पार होताच रोहितच्या नावावर खास विक्रमाची नोंद झाली. रोहित शर्मा याने कर्णधार म्हणून जवळपास 60च्या सरासरीने आणि 100हून अधिकच्या सरासरीने 1000 धावांचा टप्पा पार केल्या. रोहितने या सामन्यात 50 चेंडूत 51 धावांचे योगदान दिले. या धावा करताना त्याने 2 षटकार आणि 7 चौकारांचाही पाऊस पाडला होता.
FIFTY for @ImRo45 – his 4⃣8⃣th ODI half-century 💪 💪#TeamIndia captain is leading the charge with the bat in the chase. 👏 👏
Follow the match ▶️ https://t.co/tdhWDoSwrZ #INDvNZ | @mastercardindia pic.twitter.com/q7F69irCDq
— BCCI (@BCCI) January 21, 2023
कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणारे भारतीय फलंदाज
भारताकडून कर्णधार म्हणून सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांमध्ये अव्वलस्थानी एमएस धोनी आहे. त्याने यादरम्यान एकूण 6641 धावा केल्या होत्या. यादीत दुसऱ्या स्थानी विराट कोहली असून त्याने कर्णधार म्हणून 5449 धावा केल्या आहेत. तिसऱ्या स्थानी मोहम्मद अझरुद्दीन असून त्यांनी कर्णधार म्हणून 5239 धावा केल्या होत्या. याव्यतिरिक्त सौरव गांगुलीने कर्णधार म्हणून 5082, राहुल द्रविड याने 2658, सचिन तेंडुलकर याने 2454 आणि कपिल देव यांनी 1564 इतक्या धावा केल्या होत्या.
सामन्याचा आढावा
न्यूझीलंडने दिलेल्या 109 धावांचे आव्हान भारतीय संघाने 20.1 षटकात 2 विकेट गमावत पूर्ण केले. तसेच, मालिकेत 2-0ने आघाडी घेतली. या सामन्यात भारताकडून रोहितनेच सर्वाधिक 51 धावांचे योगदान दिले. आता मालिकेतील तिसरा आणि अखेरचा वनडे सामना मंगळवारी (दि. 24 जानेवारी) इंदोरच्या होळकर क्रिकेट स्टेडिअमवर पार पडणार आहे. (Rohit Sharma completed 1000 runs as a captain in ODI with 100 plus strike rate)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
ऍलेक्स हेल्सचे इंटरनॅशनल लीग टी20तील पहिले शतक, पाहा इतर स्पर्धेतील शतकवीरांची यादी; गेलचा दोनदा समावेश
न्यूझीलंडने टाकल्या नांग्या! भारताने अवघ्या 108 धावांवर गुंडाळला पाहुण्या संघाचा डाव