भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा वनडे विश्वचषक 2023 सुरू झाल्यापासून जबरदस्त फॉर्ममध्ये दिसत आहे. रोहितने यावर्षीच्या विश्वचषक स्पर्धेतील सहा सामन्यांमध्ये 350 पेक्षा अधिक धावा केल्या आहेत. रविवारी (29 ऑक्टोबर) भारत आणि इंग्लंड यांच्यातील सामन्यादरम्यान रोहित शर्मा याने वर्षात 1000 धावांचा टप्पा पार केला आणि काही महत्वाच्या याद्यांमध्ये आपेल नाव पक्के केले.
चालू वर्षात रोहित शर्मा याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 1000+ धावा केल्या आहेत. अशी कामगिी करणारा तो चालू वर्षातील तिसरा फलंदाज ठरला आहे. यादीत पहिला क्रमांक भारताचा युवा सलामीवीर शुबमन गिल याचा आहे. गिलने चालू वर्षात आतापर्यंत 1334 धावा केल्या आहेत. दुसऱ्या क्रमांकाल पथूम निस्सांका आहे, ज्याने यावर्षी 1062 धावा केल्या आहेत. रोहित वर्षात 1000 धावांचा टप्पा पार करणारा तिसरा खेळाडू ठरला आहे. याती चौथ्या क्रमांकावर असणाऱ्या डॅरिल मिचेल याने 974 धावा केल्या आहेत. तर पाचव्या क्रमांकावर असणाऱ्या विराटने 966 धावा आतापर्यंत केल्या आहेत. मिचेल आणि विराट देखील आपल्या आगामी सामन्यांमध्ये 1000 धावांचा टप्पा पार करू शकतात.
2023 मध्ये सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
1334 – शुबमन गिल
1062 – पाथूम निसांका
1000+ – रोहित शर्मा*
974 – डॅरिल मिचेल
966 – विराट कोहली
उभय संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज
इंग्लंड – जॉनी बेअरस्टो, डेविड मलान, जो रूट, बेन स्टोक्स, जोस बटलर (यष्टीरक्षक/कर्णधार), लियाम लिव्हिंगस्टोन, मोईन अली, ख्रिस वोक्स, डेव्हिड विली, आदिल रशीद, मार्क वूड
महत्वाच्या बातम्या –
इंग्लंडला घाम फोडणारा श्रीलंकन पठ्ठ्या वर्ल्डकपमधून बाहेर, बदली खेळाडूचीही झाली घोषणा
रोहित शर्माचा मोठा विक्रम, भारतासाठी ‘अशी’ कामगिरी करणारा ठरला सातवा कर्णधार