बर्मिंगहॅम। आज(2 जूलै) 2019 विश्वचषकात भारत विरुद्ध बांगलादेश संघात 40 वा सामना एजबस्टर्न स्टेडीयमवर सुरु आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माने शतकी खेळी केली आहे.
त्याने 90 चेंडूत त्याचे शतक पूर्ण केले आहे. याबरोबरच रोहितने 2019 च्या विश्वचषकात 500 धावांचा टप्पा पार केला आहे. एका विश्वचषकात 500 धावांचा टप्पा पार करणारा दुसराच भारतीय फलंदाज ठरला आहे. याआधी 1996 आणि 2003 च्या विश्वचषकात सचिन तेंडुलकरने सलामीला फलंदाजी करताना 500 धावांचा टप्पा पार केला होता.
त्याचबरोबर एका विश्वचषकात 500 धावांचा टप्पा पार करणारा रोहित एकूण सातवा सलामीवीर फलंदाज ठरला आहे. याआधी सलामीला फलंदाजी करताना एका विश्वचषकात 500 धावांचा टप्पा सचिन तेंडुलकर, मेथ्यू हेडन, तिलकरत्ने दिलशान, मार्टीन गप्टील, डेव्हिड वॉर्नर आणि ऍरॉन फिंच यांनी पार केला आहे.
ऑस्ट्रेलियाचे सलामीवीर फलंदाज फिंच आणि वॉर्नर यांनीही 2019 च्या विश्वचषकातच 500 धावांचा टप्पा पार केला आहे.
त्यामुळे 2019 च्या विश्वचषकात आत्तापर्यंत फिंच, वॉर्नर आणि रोहितला 500 धावांचा टप्पा पार केला आहे. तसेच रोहित हा 2019 च्या विश्वचषकात सध्या सर्वाधिक धावा करणाराही फलंदाज ठरला आहे.
#एकाच विश्वचषकात 500 किंवा त्यापेक्षा अधिक धावा करणारे सलामीवीर –
1996 – सचिन तेंडूलकर (523 धावा)
2003 – सचिन तेंडूलकर (673 धावा)
2007 – मेथ्यू हेडन (659 धावा)
2011 – तिलकरत्ने दिलशान (500 धावा)
2015 – मार्टीन गप्टील (547 धावा)
2019 – डेव्हिड वाॅर्नर (516 धावा*)
2019 – ऍरॉन फिंच (504 धावा*)
2019 – रोहित शर्मा (538 धावा*)
#2019 विश्वचषकात सर्वाधिक धावा करणारे फलंदाज
538 धावा* – रोहित शर्मा (7 सामने)
516 धावा – डेव्हिड वॉर्नर (8 सामने)
504 धावा – ऍरॉन फिंच (8 सामने)
476 धावा – जो रुट (8 सामने)
476 धावा – शाकिब अल हसन (7 सामने)
महत्त्वाच्या बातम्या –
–‘हिटमॅन’ रोहित शर्माने एमएस धोनीच्या या मोठ्या विक्रमाला टाकले मागे
–२००७ला विश्वचषकात संधी मिळालेला टीम इंडियाचा शिलेदार खेळतोय १२ वर्षांनी विश्वचषकात
–बांगलादेश विरुद्ध केदार जाधवला वगळले, त्याच्याऐवजी हा खेळाडू करतोय विश्वषकात पदार्पण