---Advertisement---

रोहित शर्माने प्लेऑफमध्ये पोहचलेल्या बेंगलोरला दिल्या शुभेच्छा, तर विराटचे ‘हे’ ट्वीट व्हायरल

On: रविवार, मे 22, 2022 11:18 AM
Rohit-Sharma
---Advertisement---

मुंबई। इंडियन प्रीमियर लीग २०२२ हंगामात ६९ वा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स संघात पार पडला. शनिवारी (२१ मे) या सामन्यात मुंबईने ५ विकेट्सने विजय मिळवत त्यांचा शेवट गोड केला. मात्र, दिल्लीला प्लेऑफला जाण्यापासून एक पाऊल दूर राहावे लागले. मुंबईने विजय मिळवल्याने रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघाचे प्लेऑफची तिकीट पक्के झाले. ज्याबद्दल मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने त्यांना शुभेच्छा दिल्या. 

शनिवारी झालेला सामना दिल्ली (Delhi Capitals) आणि बेंगलोर (Royal Challengers Bangalore) संघासाठी निर्णयक ठरणार होता. दिल्लीने हा सामना जिंकला असता, तर ते प्लेऑफला (IPL 2022 Playoffs) पोहचणारा चौथा संघ ठरला असता. पण, मुंबईने हा सामना जिंकल्याने बेंगलोर प्लेऑफला पोहचले. बेंगलोरच्या आधी राजस्थान रॉयल्स, लखनऊ सुपर जायंट्स आणि गुजरात टायटन्स या संघांनी यापूर्वीच प्लेऑफमधील जागा पक्की केली होती.

दरम्यान, मुंबईने शनिवारी विजय मिळवल्यानंतर रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघातील अनेक खेळाडूंनी मुंबई इंडियन्सचे आभार मानले. विशेष म्हणजे सामन्यापूर्वीही बेंगलोर संघाने मुंबईला पाठिंबा दिला होता.

या सामन्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) म्हणाला, ‘आम्ही लय मिळवण्यास उशीर केला. पण आम्ही कमीतकमी या हंगामातून सकारात्मक गोष्टी घेऊन जाऊ. बेंगलोरचे अभिनंदन, त्यांनी क्वालिफाय केले आहे. मी प्लेऑफमध्ये पोहचलेल्या चारही संघांना शुभेच्छा देतो. जो संघ सर्वोत्तम असेल, तो जिंकेल.’ मुंबईचे आव्हान या सामन्यापूर्वीच संपले होते. त्यामुळे मुंबईचा या हंगामातील हा अखेरचा सामना होता.

तसेच या सामन्यानंतर विराटने (Virat Kohli) ट्विट करून कोलकाता असे लिहिले आहे. तसेच त्याने मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर संघांना टॅग करत हात मिळवण्याचा इमोजीही ट्विटमध्ये टाकला आहे. विराटच्या या ट्वीटला मोठ्या प्रमाणात लाईक्स आणि रिट्वीट येत आहेत.

बेंगलोरला प्लेऑफमध्ये लखनऊ सुपर जायंट्स विरुद्ध एलिमिनेटरचा सामना २५ मे रोजी खेळायचा आहे. हा सामना कोलकातामधील ईडन गार्डन्स स्टेडियमवर होणार आहे.

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी लिंकवर क्लिक करा

महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा

महत्त्वाच्या बातम्या – 

IPL च्या १५ व्या हंगामाला मिळाले अंतिम ४ संघ, पाहा कसे आहे प्लेऑफचे संपूर्ण वेळापत्रक

अन् टीम इंडियापासून फक्त एक पाऊल दूर असलेला योगेश ताकवले अचानक गायब झाला

पाकिस्तानचा एक असा कर्णधार, ज्याचे आजोबा उत्तर प्रदेशमधून झाले होते ग्रामपंचायत सदस्य

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---