रविवारी (03 नोव्हेंबर) भारतीय संघाने न्यूझीलंडविरुद्धचा तिसरा कसोटी सामना 25 धावांच्या फरकाने गमावला. न्यूझीलंडच्या 147 धावांच्या छोटेखानी आव्हानाचा पाठलाग करताना भारतीय संघ 121 धावांवरच गुंडाळला गेला. न्यूझीलंडविरुद्ध घरच्या मैदानावर तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत क्लीन स्वीप झाल्यानंतर ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर खेळवली जाणारी पाच सामन्यांची कसोटी मालिका टीम इंडियासाठी खूप महत्त्वाची आहे. आयसीसी जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतील भारतीय संघाचा सहभाग या मालिकेवर अवलंबून आहे. परंतु भारताच्या कसोटी संघाचा कर्णधार रोहित शर्मा या मालिकेतील पहिल्या कसोटी सामन्याला शकतो.
खुद्द रोहितनेच याबाबत संकेत दिले आहेत. न्यूझीलंडविरुद्ध खेळल्या गेलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील पराभवानंतर रोहितने ही माहिती दिली. प्रथमच, एखाद्या संघाने घरच्या मैदानावर तीन किंवा अधिक सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारताचा क्लीन स्वीप केला आहे. या पराभवामुळे रोहित खूपच निराश झाला आहे.
रोहित ऑस्ट्रेलियाला जाणार नाही!
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचा पहिला सामना 22 नोव्हेंबरपासून पर्थमध्ये सुरू होत आहे. पहिल्या कसोटी सामन्यात रोहित खेळू शकेल की नाही याची खात्री नसल्याचे रोहितने म्हटले आहे. पत्रकार परिषदेत तो म्हणाला, “मी ऑस्ट्रेलियाला जाणारा की नाही अजून काही निश्चित झालेले नाही. बघूया काय होते ते.”
Rohit Sharma said, “I’m not sure about my availability for the Perth Test at the moment”. pic.twitter.com/Hru92FscNS
— Mufaddal Vohra (@mufaddal_vohra) November 3, 2024
रोहित वैयक्तिक कारणांमुळे पर्थमध्ये खेळल्या जाणाऱ्या पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर असू शकतो. असे म्हटले जात आहे की, रोहितची पत्नी रितीका सजदेह दुसऱ्या बाळाला लवकरच जन्म देणार आहे. रोहितच्या अनुपस्थितीत पहिल्या कसोटी सामन्यात उपकर्णधार जसप्रीत बुमराह संघाचे नेतृत्व करू शकतो. तर अभिमन्यू ईश्वरन यशस्वी जयस्वालसह सलामीवीराची भूमिका निभावू शकतो.
महत्त्वाच्या बातम्या-
वानखेडे कसोटीतील पराभवानंतर रोहितच्या नेतृत्त्वावर ‘डाग’, न्यूझीलंडने विक्रमांचा रचला ढीग
IND vs NZ; पराभवानंतर कर्णधाराचे मोठे वक्तव्य! म्हणाला, “आम्ही आमचे सर्वोत्तम…”
IND vs NZ; भारताचा धुव्वा उडवत न्यूझीलंडने रचला इतिहास…!