भारत आणि इंग्लंड संघादरम्यान सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात इंग्लंडने भारतावर पूर्णपणे दबाव बनवलेला आहे. भारतीय गोलंदाजांनी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी अतिशय सुमार कामगिरी केली, मात्र त्यासोबतच क्षेत्ररक्षकांनी देखील सोपे झेल सोडले. दिवसाचा खेळ संपायला काही षटकेच बाकी असताना भारताचा सलामीवीर रोहित शर्माने आणखीन एक सोपा झेल सोडला.
इंग्लंडच्या डावातील 175 वे षटक टाकण्यासाठी वॉशिंग्टन सुंदर गोलंदाजीसाठी आला होता. षटकाच्या पहिल्याच चेंडूवर आक्रमक फटका मारण्याचा डॉम बेसचा प्रयत्न फसला व चेंडू थेट मिड ऑन वर उभ्या असलेल्या रोहितकडे गेला. सोपा झेल असल्याने रोहित तो सहज पकडणार अशी सर्वांना खात्री होती मात्र रोहित चेंडूवर नियंत्रण ठेवला शकला नाही व चेंडू त्याच्या हाताला लागून जमिनीवर पडला. इतका सोपा झेल सोडल्याने रोहित देखील नाराज झालेला जाणवला.
https://twitter.com/peachworld26/status/1358007969904955393?s=08
दरम्यान सामन्याचा विचार केला असता दुसरा दिवस देखील गाजवला तो इंग्लंडचा कर्णधार जो रुटने. रुटने 377 चेंडूत 19 चौकार व 2 षटकारासह 218 धावांची शानदार खेळी केली. रुट त्रिशतक झळकावणार अशी शक्यता वाटत असतानाच शाहबाज नदीमने त्याला बाद केले.
दरम्यान सामन्याच्या दुसऱ्या दिवसाचा खेळ संपला असून इंग्लंडने 180 षटकात 8 गडी गमावत 555 धावांपर्यंत मजल मारली आहे. सामन्याच्या तिसऱ्या दिवशी इंग्लंडच्या तळाच्या फलंदाजांना झटपट बाद करण्याचे आव्हान भारतीय संघासमोर असणार आहे. तसेच सामना वाचवण्यासाठी भारतीय संघाला फलंदाजीत देखील शानदार कामगिरी करावी लागणार आहे. सर्वांना आशा असेल की क्षेत्ररक्षणात अपयशी ठरलेला रोहित फलंदाजीत मात्र उत्तम कामगिरी करेल.
महत्वाच्या बातम्या:
आयएसएल २०२०-२१ : एटीके मोहन बागानकडून ओदीशाचा धुव्वा
राज्य निवडचाचणी कुस्ती स्पर्धेत बीड जिल्ह्यातील पैलवान अमोल मुंढे विजयी! आता गाजवणार पंजाबचं मैदान