रोहित शर्मा याने बुधवारी अफगाणिस्तानविरुद्ध 131 धावांची वादळी खेळी केली. अवघ्या 63 चेंडूत त्याने आपले 7वे विश्वचषक शतक पूर्ण केले. रोहितच्या नावावर आता वनडे विश्वचषकात सर्वाधिक शतकांची नोंद झाली आहे. याचसोबत षटकारांच्या बाबतीत रोहितने माहाविक्रम केला, असे म्हणता येईल. वेस्ट इंडीजचा महान फलंदाज ख्रिस केल याचा मागच्या मोठ्या काळांपासून अबाधित असणारा विक्रम रोहितने बुधवारी अखेर मोडीत काढला.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्यांच्या यादीत रोहित शर्मा (Rohit Sharma) अखेर बुधवारी पहिल्या क्रमांकावर पोहोचला आहे. त्याच्या नावावर 453 सामन्यांमध्ये सर्वाधिक 556 षटकार नोंदवले गेले आहेत. याआधीत ख्रिस गेल या यादीत पहिल्या क्रमांकावर होता. गेलने 483 आंतरराष्ट्रीय सामन्यांमधअये 553 षटकार मारले आहेत. यादीत तिसरा क्रमांक शाहित आफ्रिदी याचा आहे. आफ्रिदीने कारकिर्दीतील 524 सामन्यांमध्ये 473 षटकार मारले होते.
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज
556 – रोहित शर्मा
553 – ख्रिस गेल
476 – शाहीद आफ्रिदी
(Rohit Sharma finally holds the record for most sixes in international cricket)
महत्वाच्या बातम्या –
वर्ल्डकपमध्ये रोहित शर्मा सर्वात बेस्ट! शतक ठोकत निघाला सचिन-विराटच्या खूप पुढे
रोहित विराटला सोडा, सचिनच्या मते ‘हा’ आहे भारताचा योद्धा खेळाडू, म्हणाला…