कोलकता। रविवारी(28 एप्रिल) आयपीएल 2019 मध्ये 47 वा सामना कोलकता नाईट रायडर्स विरुद्ध मुंबई इंडियन्स संघात इडन गार्डन स्टेडीयमवर पार पडला. या सामन्यात कोलकताने 34 धावांनी विजय मिळवला.
मात्र या सामन्यानंतर मुंबईचा कर्णधार रोहित शर्माला मॅच फीच्या 15 टक्के दंड झाला आहे. त्याने बाद झाल्यानंतर स्टंम्पला बॅट मारल्याने हा दंड करण्यात आला आहे.
कोलकताने मुंबई समोर ठेवलेल्या 233 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना रोहित चौथ्या षटकात हॅरी गर्नीच्या गोलंदाजीवर पायचीत झाला. त्यानंतर त्याने पॅव्हेलियनमध्ये परत जात असताना नॉन स्ट्रायकर एन्डच्या स्टंम्पला बॅट मारत नाराजी व्यक्त केली. त्यामुळे त्याच्यावर आयपीएलच्या आचारसंहितेचा भंग केल्याने कारवाई केली आहे.
रोहितने आयपीएलच्या आचार संहितेच्या 2.2 नियमाच्या लेव्हल 1 चा भंग केल्याचे मान्य केले आहे. याबद्दल आयपीएलच्या प्रसिद्धी पत्रकात माहिती देण्यात आली आहे.
या सामन्यात कोलकताकडून ख्रिस लिन(54), शुभमन गिल(76) आणि आंद्र रसलने(80*) अर्धशतकी खेळी केल्या. त्यामुळे कोलकताने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 2 बाद 232 धावा केल्या. मुंबईकडून हार्दिक पंड्या आणि राहुल चहरने प्रत्येकी एक विकेट घेतली.
त्यांनंतर 233 धावांचा पाठलाग करण्यासाठी उतरलेल्या मुंबईकडून हार्दिक पंड्याने तुफानी फटकेबाजी करताना 34 चेंडून 91 धावांची खेळी केली. पण त्याला शेवटी योग्य साथ न मिळाल्याने मुंबईला 20 षटकात 7 बाद 198 धावाच करता आल्या. यावेळी कोलकताकडून सुनील नारायण, गॅरी हर्नी आणि आंद्रे रसलने प्रत्येकी 2 विकेट्स घेतले. तसेच पियुष चावलाने एक विकेट घेतली.
https://twitter.com/sr_twitz/status/1122676169315274752
महत्त्वाच्या बातम्या –
–बेंगलोरचा पराभव करत ७ वर्षांनंतर दिल्लीने आयपीएलमध्ये केला तो कारनामा
–हा चाहता विराटच्या प्रतीक्षेत कोटला वर!!!
–स्टिव्ह स्मिथने घेतला डेव्हिड वॉर्नरचा अफलातून झेल, पहा व्हिडिओ