---Advertisement---

‘केवळ 94 धावांनी शतक हुकलं…’, चेन्नई कसोटीत रोहित शर्मा फ्लॉप; सोशल मीडियावर चाहत्यांनी घेरलं

On: गुरूवार, सप्टेंबर 19, 2024 12:51 PM
---Advertisement---

बांग्लादेश विरुद्धच्या दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेतील पहिला सामना चेन्नईत खेळला जात असून भारतीय संघ प्रथम फलंदाजी करत आहे. नाणेफेक गमावल्यानंतर बांग्लादेशचा कर्णधार नझमुल हुसेन शांतोने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या डावात फलंदाजीला आलेल्या टीम इंडियाची सुरुवात खूपच खराब झाली.

भारतीय संघाच्या 14 धावांवर कर्णधार रोहित शर्माच्या विकेटच्या रूपाने टीम इंडियाला मोठा धक्का बसला. बराच काळ कसोटी फॉरमॅटपासून दूर असलेला रोहित डावाच्या सुरुवातीपासूनच संघर्ष करताना दिसला आणि नंतर हसन महमूदच्या चेंडूवर स्लीपवर झेलबाद झाला. रोहित शर्मा 6 धावा करुन तंबूत परतला.

इंग्लंडविरुद्ध शेवटची कसोटी मालिका खेळणारा रोहित शर्मा दुलीप ट्रॉफी 2024 च्या पहिल्या फेरीत सहभागी झाला नाही. त्याचे परिणाम त्याला मोठ्या प्रमाणात भोगावे लागले. रोहित शर्मा बांग्लादेशी वेगवान गोलंदाजांसमोर अस्वस्थ दिसत होता. सरावाचा अभाव त्याच्या फलंदाजीत स्पष्टपणे दिसत होता. नंतर हसन महमूदच्या शानदार गोलंदाजीवर तो स्लीपवर नजमुल हुसेन शांतोच्या हाती झेलबाद झाला.

भारतीय कर्णधार रोहित शर्मा स्वस्तात बाद होताच चाहत्यांनी त्याच्यावर टीका करण्यास सुरुवात केली आणि सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर त्याला जोरदार ट्रोल देखील करण्यात येत आहे.

 

 

रोहित शर्माकडून अपेक्षा होती की तो कसोटीतही आपली फाॅर्म चांगले दाखवेल पण त्याने पूर्णपणे निराश केला आहे. स्वस्तात बाद झाला. आता हिटमॅनच्या चाहत्यांना आशा असेल की जर रोहितला दुसऱ्या डावात संधी मिळाली तर तो चमत्कार करेल आणि त्याच्या टीकाकारांना चोख प्रत्युत्तर देईल.

भारतीय संघाच्या खराब सुरुवातीनंतर यशस्वी जयस्वाल आणि रिषभ पंत यांनी डाव सावरला. पण लंच ब्रेकनंतर परतल्यानंतर रिषभ पंत बाद झाला. त्याने संघासाठी महत्वपूर्ण 39 धावा करुन बाद झाला. हसन मेहमूदने रिषभ पंतला तंबूत पाठवले. तत्तपर्वी चाैथ्या विकेटसाठी यशस्वी जयस्वाल आणि रिषभ पंत यांनी 62 धावांची भागीदारी केली. याबातमी आखेरीस भारतीय संघ 103-4 अश्या परिस्थितीत होता.

हेही वाचा-

धोनीचा मोठा विक्रम आता धोक्यात, रिषभ पंतची वेगानं घोडदौड सुरु
‘क्रिकेट हे हिंदू जीवनापेक्षा महत्त्वाचे…’ सोशल मीडियावर बांगलादेश क्रिकेटवर बहिष्कार घालण्याची मागणी
ind vs ban; टाॅप ऑर्डर युनीट सपशेल फ्लाॅप; रोहित-विराट सहा, तर गिल शून्यवर बाद

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---