---Advertisement---

हिटमॅनची विसरण्याची सवय कायम! इंग्लंडविरुद्ध मालिका जिंकल्यानंतर चक्क ट्रॉफी घ्यायला विसरला?

On: शुक्रवार, फेब्रुवारी 14, 2025 2:20 PM
---Advertisement---

चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी इंग्लंडने मार्यादित फाॅरमॅटच्या क्रिकेट मालिकेसाठी टीम इंडियाचा दाैरा केला. दोन्ही संघांमध्ये 5 सामन्यांची टी20 आणि 3 सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळवण्यात आली. पहिल्या टी20 मालिकेत टीम इंडियाने 4-1 असा विजय मिळवला. त्यानंतर एकदिवसीय मालिकेत रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील टीम इंडियाने इंग्लंडला 3-0 ने क्लीन स्वीप केले. तर या क्लीन स्वीपनंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मा ट्रॉफी घ्यायला विसरला का? यासंबंधीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे.

रोहित शर्मा त्याच्या विसरण्याच्या सवयीसाठी खूप प्रसिद्ध आहे. बऱ्याचदा हिटमॅन त्याच्या गोष्टी विसरतो. तर आता आपण जाणून घेऊया की मालिता जिंकल्यानंतर रोहित खरोखरच ट्रॉफी घ्यायला विसरला का? व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्ही हे ठरवू शकता.

खरंतर, व्हिडिओमध्ये रोहित शर्मासोबत विराट कोहली आणि केएल देखील उपस्थित असल्याचे दिसून येते. तिन्ही खेळाडू ट्रॉफीच्या पलीकडे जातात. मग कोहली आणि रोहित मागे वळून पाहतात आणि दोघेही ट्रॉफीकडे पाहतात. यानंतर रोहित शर्मा आणि केएल राहुल परत जातात आणि ट्रॉफी उचलतात.

पाहा व्हिडिओ…

रोहित शर्मा: भारतीय कर्णधार रोहित शर्माने इंग्लंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील दुसऱ्या सामन्यात शानदार खेळी केली, त्याने 90 चेंडूत 12 चौकार आणि 7 षटकारांच्या मदतीने 119 धावा केल्या. चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी कर्णधाराचे हे शतक टीम इंडियासाठी मोठा दिलासा देणारे आहे.

विराट कोहली: मालिकेतील तिसऱ्या एकदिवसीय सामन्यात विराट कोहलीने अर्धशतकी खेळी केली. कोहलीने 55 चेंडूत 7 चौकार आणि 1  षटकाराच्या मदतीने 52 धावा केल्या. चाहत्यांना चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये कोहलीकडून शानदार फलंदाजीची अपेक्षा असेल.

हेही वाचा-

क्रिकेटचा महाकुंभ! चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी आयसीसीनं जाहीर केली ऐतिहासिक बक्षीस रक्कम
IPL 2025 पूर्वी आठ संघांचे नेतृत्व स्पष्ट, उर्वरित दोन संघांच्या घोषणेची प्रतीक्षा
CT 2025: संघासाठी वाईट बातमी, प्रमुख खेळाडूच्या दुखापतीमुळे संतुलन बिघडले?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---