---Advertisement---

‘सिक्सर किंग’ रोहित! आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या खेळाडूंच्या यादीत पोहोचला ‘या’ स्थानी

On: शनिवार, एप्रिल 17, 2021 9:10 PM
---Advertisement---

आयपीएलच्या आजच्या सामन्यात चेन्नईच्या मैदानावर मुंबई इंडियन्स आणि सनरायझर्स हैद्राबाद हे संघ आमने-सामने आले आहेत. या सामन्यात मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. सलामीला आलेल्या यष्टीरक्षक-फलंदाज क्विंटन डी कॉक आणि रोहित शर्माने ६ षटकांतच ५३ धावांची सलामी दिली.

यात विशेषकरून रोहित शर्माने गोलंदाजांवर चौफेर हल्ला चढवला. त्याने पॉवर प्लेच्या निर्बंधांचा फायदा उठवत आक्रमक फलंदाजी केली. सातव्या षटकात तो विजय शंकरच्या गोलंदाजीवर बाद झाला. मात्र तत्पूर्वी त्याने २५ चेंडूत ३२ धावांची खेळी केली होती. या खेळी दरम्यान त्याने एक खास विक्रम आपल्या नावे केला.

षटकारांच्या यादीत पोहोचला अव्वल स्थानी
रोहित शर्माने या खेळी दरम्यान २ षटकार मारले. या षटकारांसह रोहित आयपीएल इतिहासात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी पोहोचला. त्याच्या नावे आता एकूण २१७ षटकार आहेत. रोहितने यात २१६ षटकार नावे असलेल्या एमएस धोनीला मागे टाकले. या यादीत धोनी नंतर विराट कोहली, सुरेश रैना आणि रॉबिन उथप्पा हे अनुक्रमे तिसर्‍या, चौथ्या आणि पाचव्या स्थानी आहेत.

आयपीएलमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय फलंदाज –
१) रोहित शर्मा – २१७*
२) एमएस धोनी – २१६
३) विराट कोहली – २०१
४) सुरेश रैना – १९८
५) रॉबिन उथप्पा – १६३

रोहित शर्मा सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय खेळाडूंच्या यादीत अव्वल स्थानी तर पोहोचलाच. मात्र याशिवाय सगळया खेळाडूंच्या यादीत देखील तिसर्‍या स्थानी पोहोचला. यात स्फोटक फलंदाज ख्रिस गेल अव्वल स्थानी असून त्याच्या नावे तब्बल ३५१ षटकार आहेत. दुसर्‍या स्थानावर एबी डिव्हिलियर्स असून त्याच्या नावे २३७ षटकार आहेत.

आयपीएल इतिहासात सर्वाधिक षटकार मारणारे फलंदाज –
१) ख्रिस गेल – ३५१
२) एबी डिव्हिलियर्स – २३७
३) रोहित शर्मा – २१७*

महत्त्वाच्या बातम्या – 

ख्रिस गेलच्या भारत प्रेमाला तोड नाही, हिंदीनंतर शिकतोय ‘ही’ भारतीय भाषा

मध्यप्रदेशच्या क्रिकेटरला ऑनलाइन पिझ्झा मागवणे पडले महागात; झाली तब्बल ५० हजारांची लूट, वाचा सविस्तर

वार्षिक करारातील जडेजाच्या श्रेणीवरून होतोय वाद, वॉननंतर माजी भारतीय खेळाडूचीही टीका

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---