साउथँम्पटन। आज(22 जून) आयसीसी 2019 क्रिकेट विश्वचषकात 28 वा सामना भारत विरुद्ध अफगाणिस्तान संघात होत आहे. द रोज बॉल स्टेडियमवर सुरु असलेल्या या सामन्यात भारताने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे.
पण भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा आज 1 धाव करुन लवकर बाद झाला आहे. त्याला 5 व्या षटकातील दुसऱ्या चेंडूवर अफगाणिस्तानचा फिरकी गोलंदाज मुजीब उर रेहमानने त्रिफळाचीत केले आहे. त्यामुळे 2019 च्या विश्वचषकात फिरकीपटू विरुद्ध बाद होणारा रोहित पहिलाच भारतीय फलंदाज ठरला आहे.
याआधी या विश्वचषकात एकदाही भारतीय फलंदाज फिरकी गोलंदाजाविरुद्ध बाद झाले नव्हते. या सामन्याआधी या विश्वचषकात भारतीय क्रिकेटपटू 53 षटके फिरकी गोलंदाजीला सामोरे गेले आहेत. यात त्यांनी 339 धावा केल्या आहेत.
त्याचबरोबर आत्तापर्यंत इम्रान ताहीर, ताब्राईज शाम्सी, ग्लेन मॅक्सवेल, ऍडम झंपा, इमाद वासिम, शोएब मलिक, मोहम्मद हफिज, शादाब खान या फिरकीपटूंनी भारताविरुद्ध या विश्वचषकात गोलंदाजी केली होती. यातील एकालाही भारताविरुद्ध विकेट घेता आली नव्हती.
आजच्या सामन्यात रोहित बाद झाल्यानंतर केएल राहुल आणि विराट कोहलीने भारताचा डाव सांभाळताना दुसऱ्या विकेटसाठी 57 धावांची भागीदारी रचली. पण राहुल 30 धावांवर बाद झाल्याने ही जोडी तुटली. राहुलला मोहम्मद नबीने बाद केली. राहुल बाद झाल्यानंतर विजय शंकर आज चौथ्या क्रमांकावर फलंदाजीला आला आहे.
क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.
महत्त्वाच्या बातम्या –
–विश्वचषक २०१९: लसिथ मलिंगाने रचला इतिहास, केला नवीन विश्वविक्रम
–विश्वचषक २०१९: अफगाणिस्तान विरुद्धच्या सामन्यासाठी अशी आहे ११ जणांची टीम इंडिया
–टॉप ५: भारत-अफगाणिस्तान सामन्यात हे खास ५ विक्रम करण्याची भारतीय खेळाडूंना संधी