‘त्याला डिलीट कर यार…’, पंतच्या इंस्टा लाईव्हदरम्यान रोहितचे लक्षवेधी भाष्य

'त्याला डिलीट कर यार...', पंतच्या इंस्टा लाईव्हदरम्यान रोहितचे लक्षवेधी भाष्य

भारतीय संघ सध्या वेस्ट इंडीजमध्ये आहे. संघाला त्याठिकाणी तीन सामन्यांची एकदिवसीय आणि पाच सामन्यांची टी-२० मालिका खेळायची आहे. एकदिवसीय मालिकेत भारताने ०-२ अशी विजयी आघाडी घेतली असून आता संघ टी-२० मालिका नावावर करण्याच्या प्रयत्नात आहे. टी-२० मालिकेसाठी कर्णधार रोहित शर्मा आणि रिषभ पंत त्रिनिदादमध्ये दाखल झाले असून सोशल मीडियावर त्यांची चांगलीच चर्चा होत आहे.

युवा यष्टीरक्षक फलंदाज रिषभ पंत (Rishabh Pant) त्रिनिदादमध्ये पोहोचल्यानंतर त्याने  संघातील सहकाऱ्यांसोबत इंस्टाग्राम लाईव्ह केले. यामध्ये कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma), सूर्यकुमरा यादव आणि युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) सहभागी झाले होते. यावेळी काही घडले, ज्यामुळे रोहितने पंतकचे लाईव्हमधून चहलला बाहेर काढण्याची मागणी केली. रोहितचा हा मजेशीर स्वाभाव चाहत्यांना चांगलाच भावल्याचे दिसत आहे.

चाहत्यांसोबत चर्चा करण्यासाठी रिषभ पंतने रोहित आणि सूर्यकुमारला सोबत घेतले. त्यानंतर पंतने युझवेंद्र चहलला देखील लाईव्हमध्ये घेतले. या चौघांमधील मजेशीर चर्चा पाहून चाहत्यांचे चांगलेच मनोरंजन झाले. चौघांमध्ये थोडा वेळ चर्चा झाल्यानंतर रोहितने चहलला लाईव्हमधून काढण्याची मागणी केली. रोहित पंतला म्हणाला की, “युझीला डिलीट कर ना यार.”

https://twitter.com/GOATED_ROHIT/status/1551966454366769157?s=20&t=nS-LU6qcyRhpK-dDvBya2g

लाईव्हदरम्यान, पंतने काही चाहत्यांना देखील बोलण्याची संधी दिली. पंत या चाहत्यांसोबत मजेशीर चर्चा करून त्यांचे मनोरंजन करतण्याचा प्रयत्न करत होता. पण रोहित मात्र वेगळ्याच विचारात होता. रोहित लाईव्हमध्ये जोडल्या गेलेल्या चाहत्यांचीच फिरकी घेत असल्याचे पाहायला मिळाले.

खेळाडूंच्या या लाईव्हमध्ये सर्वात चर्चेचा विषय ठरला तो म्हणजे एमएस धोनी. पंतने धोनीची पत्नी साक्षीला लाईव्हमध्ये जोडले. लाईव्ह आल्यानंतर साक्षीने मोबाईल धोनीकडे केला आणि चाहत्यांना त्याची एक झल दिसली. धोनीने चाहत्यांकडे पाहून ‘हॅलो’ देखील केले. कदाचीत ही पहिलीच वेळ असेल, जेव्हा धोनी एखाद्या इंस्टाग्राम लाईव्हमध्ये चाहत्यांसमोर आला आसेल. त्याची एक झलक पाहिल्यामुळे चाहते खुश झाल्याचे दिसत आहे.

महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

महत्वाच्या बातम्या – 

हा माजी भारतीय क्रिकेटर म्हणतोय,”सात-सात तास वनडे क्रिकेट कोण पाहणार?”

प्रेग्नेंसीनंतर ‘ही’ भारतीय महिला क्रिकेटर परतणार मैदानावर, बनणार पहिलीच क्रिकेटर

शास्त्री म्हणतायेत, “सचिनसारखा किडा आत्ताच्या टीम इंडियातील कोणातच नाही”

Next Post

टाॅप बातम्या

Welcome Back!

Login to your account below

Retrieve your password

Please enter your username or email address to reset your password.