रोहित शर्मा याच्यासाठी मंगळवारी (24 जानेवारी) खास आहे. कारण सोमवारी (23 जानेवारी) त्याने वनडे क्रिकेटमध्ये सलामीवीराच्या रूपात 10 वर्ष पूर्ण केली. बरोबर 10 वर्षांपूर्वी रोहित शर्मा भारतासाठी वनडे क्रिकेटमध्ये पहिल्यांदा सलामीवीर म्हणून खेळपट्टीवर उतरला होता. त्याने मोहालीत खेळलेल्या इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात 83 धावांची खेळी केली आणि यापुढे त्याची वनडे कारकीर्द पूर्णपणे बदलून गेली. भारतीय संघचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांनी याविषयी खास प्रतिक्रिया दिली.
रोहित शर्मा (Rohit Sharma) 23 जानेवारी, 2013 पर्यंत वनडे कारकिर्दीत अपेक्षित प्रदर्शन करू शकला नव्हता. पण जेव्हा त्याला पहिल्यांदा संघासाठी डावाची सुरुवात करण्याची संधी मिळाली, तेव्हापासून गोष्टी पूर्णपणे बदलल्या. जिम्बाब्वेविरुद्धच्या एका मालिकेत त्याने त्याने अपेक्षित प्रदर्शन केले नाही, म्हणून 2011 वनडे विश्वचषकासाठी भारतीय संघात स्थान मिळाले नाही. पण त्यानंतर 18 महिन्यांनी त्यावेळी संघाचा कर्णधार असलेल्या एमएस धोनी (MS Dhoni) याने रोहित शर्माला सलामीवीराच्या रूपात खेळण्याचा प्रस्ताव दिला. यानंतर रोहितच्या कारकिर्दीला खऱ्या अर्थाने गती मिळाली.
वनडे क्रिकेटमध्ये रोहितने केलेली कामगिरी त्याला क्रिकेट इतिहासातील महान खेळाडूंमध्ये सामील करते. त्याच्या नावावर वनडे क्रिकेटमध्ये आतापर्यंत 240 धावांची नोंद आहे. सामन्यांमध्ये रोहितने 48.65 च्या सरासरीने 9681 धावा केल्या आहेत. यादरम्यान रोहितची सर्वात मोठी धावसंख्या 264 राहिली आहे. यादरम्यान त्याने 29 शतक आणि 48 अर्धशतक केले. वनडे क्रिकेटमध्ये रोहितच्या नावावर तीन द्विशतकेही आहेत. भारतीय संघ मंगळवारी रोहितच्या नेतृत्वात न्यूझीलंडविरुद्ध तिसरा आणि शेवटचा वनडे सामना खेणार आहेत. तत्पूर्वी संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड (Rahul Dravid) माध्यमांशी बोलत होते.
रोहितने सलामीवीराच्या रूपात स्वतःच्या वनडे कारकिर्दीतील 10 वर्ष पूर्ण केल्याच्या पार्श्वभूमीवर द्रविड म्हणाला, “तो एक अप्रतिम क्रिकेटपटू आहे. त्याने एका सर्वसामन्य खेळाडूप्रमाणेच क्रिकेटची सुरुवात केली होती. मला आठवते की तो 17 किंवा 18 वर्षांचा असताना मी त्याला पहिल्यांदा पाहिले होते. तो 19 वर्षांखालील संघात होता आणि तुम्ही आता पाहू शकता की, खूप मोठा बदल झाला आहे. रोहितने मागच्या 15 वर्षांमध्ये जे केले आहे, ते भारतासाठी एक बेंचमार्क आहे. पण 10 वर्षांपूर्वी त्याला जेव्हा सलामीवीराच्या रूपात संधी मिलाली, तेव्हा त्याच कारकिर्दीतील हा टर्निंक पॉइंट होता. या फॉरमॅटमध्ये तीन द्विशतकांचा विक्रम अद्भुत आहे.” (Rohit Sharma has completed 10 years as an opener in the ODI format)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
शाब्बास रे! कंडक्टर आईने वाढवलेल्या मुंबईकर अथर्वचा द्विशतकी धमाका
VIDEO | राहुल-अथियाच्या लग्नात विराट-जड्डूचा कहर डान्स, सोशल मीडियावर मिम्सचा पाऊस