मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा यावर्षी आयपीएलमध्ये सुमार खेळी करत आहे. मुंबई इंडियन्स विरुद्ध लखनऊ सुपर जायंट्स अला एलिमिनेटर सामना बुधवारी (24 मे) चेन्नईच्या चेपॉक स्टेडियमवर खेळला गेला. इंडियन प्रीमियर लीगच्या इतिहासात रोहित शर्मा प्लेऑफ सामन्यांमध्ये नेहमीच अपयशी ठरला आहे. यावर्षीच्या एलिमिनेटर सामन्यात देखील ही गोष्ट तंतोतंत खरी ठरली.
इंडियन प्रीमियर लीग 2023 (IPL 2023) मध्ये खेळपट्टी फलंदाजांसाठी अधिक अनुकूल पाहायला मिळाली आहे. कोणता संघ किती धावा करेल, याचा काही नेम नाही. असात नाणेफेक जिंकणारा संघ बहुतांश वेळा प्रथम गोलंदाजीच घेत आहे. मात्र, बुधवारी एलिमिनेटर सामन्यात रोहित शर्मा (Rohit Sharma) याने हा पायंडा मोडला. नाणेफेक जिंकून रोहितने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. पण आपल्या संघासाठी रोहित डावाची सुरुवात चांगली करून देऊ शकला नाही. 10 चेंडूत अवघ्या 11 धावा करून मुंबईच्या कर्णधाराने विकेट गमावली. रोहितपाठोपाठ सलामीवीर ईशान किशन देखील 15 धावा करून बाद झाला.
लखनऊ सुपर जायंट्सविरुद्धच्या या एलिमिनेटर सामन्यानंतर रोहितची प्लेऑफमधील आकडेवारी अधिकच खालावली. रोहितने आयपीएलमध्ये अंतिम सामने वगळता आतापर्यंत एकूण 13 प्लेऑफ सामने खेळले आहेत. यादरम्यान रोहितच्या बॅटमधून अवघ्या 114 धावा आल्या आहेत. या धावा त्याने 9.5च्या सरासरीने, तर 86.4 च्या स्ट्राईक रेटने केल्या आहेत. 26 धावा ही रोहितली प्लेऑफमधील सर्वोत्तम खेळी राहिली आहे.
आयपीएलच्या प्लेऑफ सामन्यांमध्ये रोहित शर्माची आकडेवारी (अंतिम सामने वगळता)
डाव – 13
धावा – 114
सरासरी – 9.5
स्ट्राईक रेट – 86.4
सर्वोत्तम खेळी – 26
यावर्षी रोहितचे एकंदरीत आयपीएल प्रदर्शन पाहिले, तर त्याने 15 सामन्यांमध्ये 21.60च्या सरासरीने 324 धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने सर्वोत्तम खेळी 65 धावांची होती. हंगामात रोहित दोन वेळा अर्धशतक करू शकला, तर दोन वेळा शुन्यावर बाद झाला. (Rohit Sharma has once again failed in the playoffs. See stats)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
सीएसकेच्या सीईओंना काढावी लागली जडेजाची समजूत! गुजरातविरुद्ध जिंकूनही अष्टपैलू नाराज?
अटीतटीच्या सामन्यात टॉस जिंकून मुंबईचा बॅटिंगचा निर्णय, लखनऊपुढे ठेवणार का मोठे आव्हान?