भारतीय क्रिकेट संघाचा दिग्गज क्रिकेटपटू रोहित शर्माने आंतरराष्ट्रीय कसोटी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. (Rohit Sharma Retired From Test Cricket)
रोहित शर्माने (Rohit Sharma) इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर करून ही माहिती दिली आहे. रोहितने त्याच्या पोस्टमध्ये लोकांच्या प्रेमाबद्दल आभार मानले आहेत.
रोहित शर्माने इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेयर करत लिहलं की, “हॅलो! मी कसोटी क्रिकेटमधून निवृत्त होत आहे. कसोटी क्रिकेटमध्ये देशाचे नेतृत्त्व करणे ही अभिमानास्पद गोष्ट होती. तुमचा पाठिंबा आणि दाखवलेल्या प्रेमासाठी मी आभारी आहे. वनडे क्रिकेटमध्ये मी टीम इंडियाकडून खेळत राहिल. रोहित शर्मा (वनडे कर्णधार, टीम इंडिया)”
???? ROHIT SHARMA RETIRED FROM TEST CRICKET ???? pic.twitter.com/Yjtz8onaOr
— Johns. (@CricCrazyJohns) May 7, 2025
रोहितच्या कसोटी क्रिकेटमधील आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीबद्दल बोलायचे झाल्यास, त्याने भारतासाठी 67 कसोटी सामने खेळले आहेत. त्यामध्ये त्याने 116 डावात फलंदाजी करताना 40.57च्या सरासरीने 4,301 धावा केल्या आहेत. दरम्यान त्याची सर्वोच्च धावसंख्या 212 राहिली. कसोटीमध्ये रोहितने 18 अर्धशतकांसह 12 शतके झळकावली आहेत.






