---Advertisement---

रोहित शर्माच्या चाहत्यांसाठी ही आहे खुशखबर…

On: गुरूवार, फेब्रुवारी 20, 2020 5:58 PM
---Advertisement---

भारतीय संघाचा उपकर्णधार (Vice-Captain) आणि आयपीएलमधील (IPL 2020) मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्मा  (Rohit Sharma) आता दुखापतीतून सावरताना दिसत आहे. न्यूझीलंडच्या माउंट माउंगानुई (Mount Maunganui) येथे 5 सामन्यांच्या आंतरराष्ट्रीय टी20 मालिकेतील शेवटचा सामना पार पडला होता. यादरम्यान रोहितला दुखापत (Injury) झाली होती.

यावेळी फलंदाजी करताना रोहितच्या पोटरीचा स्नायू दुखावला होता. त्यामुळे त्याला उर्वरित न्यूझीलंड दौऱ्यातून बाहेर पडावे लागले. परंतु आता रोहित या दुखापतीतून दिसत आहे. तसेच त्याने जिममध्ये वर्कआउट करण्यास सुरुवात केली आहे.

आयपीएलमध्ये रोहित मुंबई इंडियन्सचा कर्णधार (Captain) आहे. त्यामुळे मुंबई इंडियन्सलाही तो लवकरात लवकर दुखापतीतून सावरावा अशी अपेक्षा असेल. कारण 29 मार्चपासून आयपीएलचा 13 वा हंगाम सुरु होत आहे.

बुधवारी (19 फेब्रुवारी) रोहित शर्माने आपल्या अधिकृत इन्स्टाग्रााम अकाऊंटवरून जिममध्ये वर्कआऊट करतानाचा व्हिडिओ पोस्ट केला होता. हा व्हिडिओ पोस्ट केल्यानंतर काही वेळातच मुंबई इंडियन्सने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे.

https://www.instagram.com/p/B8tN4sKhAuZ/?utm_source=ig_web_copy_link

25 सेकंदाच्या जिममधील या व्हिडिओमध्ये रोहित डेड लिफ्ट वर्कआउट करताना दिसत आहे. डेड लिफ्ट वर्कआउटचा ताण कमरेवर आणि पायांवर पडतो. या वर्कआउट दरम्यान पोटरीच्या स्नायूंवरदेखील ताण पडतो.

आयपीएलच्या सामन्यापुर्वी 12 ते 18 मार्च दरम्यान दक्षिण आफ्रिका विरुद्ध भारत संघात 3 सामन्यांची वनडे मालिका होणार आहे. कदाचित रोहित या मालिकेतून पुनरागमन करेल.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---