---Advertisement---

रोहित शर्मा १२ धावांवर बाद झाला पण केला हा मोठा विक्रम

On: गुरूवार, सप्टेंबर 19, 2019 3:18 PM
---Advertisement---

मोहाली| भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका संघात बुधवारी दुसरा टी20 सामना पार पडला. या सामन्यात भारताने 7 विकेट्सने सहज विजय मिळवला. या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 150 धावांचे आव्हान ठेवले होते.

मात्र भारताकडून 150 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा 12 धावा करुन लवकर बाद झाला. पण असे असले तरी रोहितने खास विक्रम केला आहे. त्याने या 12 धावा दोन षटकार मारत पूर्ण केल्या.

या दोन षटकारांमुळे तो आंतरराष्ट्रीय टी20मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध भारताकडून सर्वाधिक षटकार मारणारा फलंदाज ठरला आहे. त्याचे आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध टी20मध्ये 14 षटकार झाले आहेत. त्याने हा विक्रम करताना सुरेश रैनाला मागे टाकले आहे. रैनाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध आंतरराष्ट्रीय टी20मध्ये 13 षटकार मारले आहेत.

बुधवारी पार पडलेल्या भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका सामन्यात दक्षिण आफ्रिकेने प्रथम फलंदाजी करताना 20 षटकात 5 बाद 149 धावा केल्या होत्या आणि भारतासमोर विजयासाठी 150 धावांचे आव्हान ठेवले होते. दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार क्विंटॉन डीकॉकने सर्वाधिक 52 धावांची खेळी केली. तसेच तेंबा बाउमाने 49 धावांची खेळी केली.

भारताकडून दीपक चाहरने सर्वाधिक 2 विकेट्स घेतल्या. तसेच रविंद्र जडेजा, नवदीप सैनी आणि हार्दिक पंड्याने प्रत्येकी एक विकेट घेतली.

त्यानंतर 150 धावांचे आव्हान भारताने 19 षटकात 3 विकेट्सच्या मोबदल्यात सहज पार केले. भारताकडून कर्णधार विराट कोहलीने 72 धावांची नाबाद अर्धशतकी खेळी केली. तसेच त्याने शिखर धवनबरोबर दुसऱ्या विकेटसाठी 61 धावांची महत्तपूर्ण भागीदारी रचली. शिखरने 40 धावा केल्या.

दक्षिण आफ्रिकेकडून अँडील फेहलूक्वायो, कागिसो रबाडा आणि बीजॉर्न फॉर्च्यूनने प्रत्येकी 1 विकेट घेतली.

आंतरराष्ट्रीय टी20मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्ध सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय क्रिकेटपटू –

14 षटकार – रोहित शर्मा

13 षटकार – सुरेश रैना

9 षटकार – विराट कोहली

6 षटकार – एमएस धोनी

5 षटकार – शिखर धवन/मनिष पांडे/शिखर धवन

क्रीडा क्षेत्रातील ताज्या घडामोडी, बातम्या, सदरे आणि विशेष लेखांसाठी लाईक करा महा स्पोर्ट्सचे फेसबुक पेज. आपणास व्हाॅट्सअपच्या माध्यमातून हे सर्व हवे असेल तर आम्हाला 9860265261 या व्हाॅट्सअप क्रमांकावर Join Maha असा मेसेज नक्की करा.

महत्त्वाच्या बातम्या – 

आजच्याच दिवशी युवराजने ६ चेंडूत ६ षटकार मारत रचलेला होता इतिहास, पहा व्हिडिओ

टॉप ५: विराट कोहलीने द.अफ्रिकेविरुद्ध अर्धशतकी खेळी करत केले हे खास ५ विक्रम

व्हिडिओ: विराट कोहली, रविंद्र जडेजाने घेतलेले हे जबरदस्त झेल पाहिले का?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment