अहमदाबाद येथे भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील चौथा आणि अखेरचा कसोटी सामना खेळला जात आहे. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पोहोचण्यासाठी भारतीय संघाला हा सामना जिंकणे खूप गरजेचे आहे. या कसोटीत ऑस्ट्रेलियाने 400 हून अधिक धावांचा डोंगर उभारला आहे. या आव्हानाचा पाठलाग करताना भारताने एक विकेटही गमावली आहे. ही विकेट रोहित शर्मा याची होती. मात्र, रोहितने यावेळी एक खास विक्रम आपल्या नावावर केला आहे. विशेष म्हणजे, अशी कामगिरी करणारा तो दुसराच भारतीय ठरला आहे.
काय आहे रोहितचा विक्रम?
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात उभारलेल्या 480 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना भारताकडून कर्णधार रोहित शर्मा आणि शुबमन गिल सलामीला उतरले होते. यावेळी रोहितच्या रूपात भारताला पहिला झटका बसला. रोहित अवघ्या 35 धावांवर तंबूत परतला. यावेळी भारताची धावसंख्या 74 होती. रोहितने 35 धावा करताना 1 षटकार आणि 3 चौकारांची बरसात केली. तो बाद झाला असला, तरी त्याने खास विक्रम केला. रोहित मायदेशात खेळताना कसोटीत वेगवान 2000 धावा करणारा दुसरा फलंदाज बनला.
रोहित शर्माने 24 सामन्यातील 36 डावात 66.73च्या सरासरीने फलंदाजी करताना 2002 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 6 अर्धशतके आणि तब्बल 8 शतकेही झळकावली आहेत.
रोहितची कसोटी कारकीर्द
भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने भारताकडून 49 कसोटी सामने खेळले आहेत. यातील 83 डावांमध्ये रोहितने 45.66च्या सरासरीने 3379 धावा केल्या आहेत. या धावा करताना त्याने 9 शतके आणि 14 अर्धशतकेही झळकावली आहेत. विशेष म्हणजे, त्याने 1 द्विशतकही केले आहे. 212 ही यादरम्यानची त्याची सर्वोत्तम खेळी आहे.
मालिकेत भारताची आघाडी
भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया संघातील 4 सामन्यांच्या कसोटी मालिकेत भारत आघाडीवर आहे. भारतीय संघाने पहिल्या तीनपैकी 2 सामने जिंकले असून मालिकेत 2-1ने आघाडी घेतली आहे. आता चौथ्या सामन्यात भारतीय संघ काय कमाल दाखवतो, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Rohit Sharma in Tests in India take a look)
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
चौथ्या कसोटीत 9 धावा करताच पुजाराचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध जबरदस्त विक्रम, यादीत विराटचा नंबर शेवटचा
बापाची छाती गर्वाने फुगली! कर्णधार बनताच बावुमाने ठोकले पहिले शतक, वडिलांकडून टाळ्यांचा कडकडाट; Video