---Advertisement---

ज्याची भीती होती तेच घडलं! रोहित शर्माच्या दुखापतीवर मोठी अपडेट, किती दिवस मैदानाबाहेर राहणार हिटमॅन?

On: बुधवार, एप्रिल 15, 2026 6:30 PM
---Advertisement---

मुंबईचा आधारस्तंभ असलेल्या रोहित शर्माला झालेल्या दुखापतीमुळे चाहते चिंतेत होते. एकाच सामन्यात रोहित आणि विराट या दोघांनाही एकाच वेळी दुखापत झाल्यामुळे मोठी खळबळ उडाली होती. आता, रोहित शर्माबाबतची तीच भीती खरी ठरली आहे. हिटमॅनच्या बाबतीत मुंबई इंडियन्ससाठी एक वाईट बातमी समोर आली आहे. आरसीबी (RCB) विरुद्धच्या सामन्यादरम्यान रोहितला हॅमस्ट्रिंगची दुखापत झाली, ज्यामुळे त्याला सामन्याच्या मध्येच मैदान सोडावे लागले.

रिपोर्ट्सनुसार, रोहित शर्मा पुढील दोन सामन्यात संघाबाहेर राहण्याची शक्यता आहे. मुंबईचा सामना 16 एप्रिल रोजी पंजाब किंग्जविरुद्ध आणि 20 एप्रिल रोजी गुजरात टायटन्सविरुद्ध होणार आहे. या हंगामात हिटमॅन अत्यंत बहारदार फॉर्ममध्ये आहे. त्याने चार सामन्यांमध्ये 45.67 च्या सरासरीने शिवाय 165.06च्या स्ट्राईक रेटने 137 धावा केल्या आहेत. त्याने एक अर्धशतकही झळकावले आहे.

मुंबईने या हंगामातील आपल्या मोहिमेची सुरुवात विजयाने केली होती. गेल्या 14 हंगामांपासून मुंबईच्या संघाला आपला सलामीचा सामना जिंकता आला नव्हता. मात्र, यावेळी ती मालिका अखेर खंडित झाली. तरीही, तो सुरुवातीचा विजय आता संघासाठी काहीसा शाप ठरत असल्याचे दिसून येत आहे. हार्दिक आणि त्याचा संघ पंजाबविरुद्धच्या आगामी सामन्यात विजयाच्या आशेने मैदानात उतरेल. संघाची सर्वात मोठी चिंता म्हणजे त्यांचा प्रमुख वेगवान गोलंदाज जसप्रीत बुमराहचा फॉर्म; ज्याने अद्याप आपले खातेही उघडलेले नाही. आता संघ सलामीची कोणती जोडी मैदानात उतरवतो, हे पाहणे बाकी आहे.

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---