---Advertisement---

क्रिकेटमध्ये असं दुर्भाग्य कुणाचंच नसेल! रोहितच्या नावावर नकोसा विक्रम

On: मंगळवार, मार्च 4, 2025 3:21 PM
---Advertisement---

(Champions Trophy IND vs AUS toss) भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आपल्या आक्रमक फलंदाजीसाठी ओळखला जातो, पण टॉसच्या बाबतीत मात्र नशिबाने त्याची साथ सोडली आहे. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियामधील पहिल्या सेमीफायनल सामन्यातही हीच कहाणी पुन्हा घडली. टॉससाठी मैदानावर उतरलेल्या रोहितने सलग 11व्यांदा नाणेफेक गमावण्याचा दुर्दैवी विक्रम आपल्या नावावर नोंदवला. या  संदर्भात तो आता दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. हा विक्रम हिटमॅनच्या कामगिरीवर फारसा परिणाम होणार नसला तरी, टॉसच्या बाबतीत त्याचे नशीब ढळलेलेच दिसते. (Rohit Sharma toss record)

वनडे क्रिकेटच्या इतिहासात वेस्ट इंडिजचा महान फलंदाज आणि माजी कर्णधार ब्रायन लारा यांनी सलग 12 वेळा नाणेफेक गमावली, हा विक्रम आजतागायत कायम आहे. लारांसारख्या दिग्गज खेळाडूनेही एवढ्या वेळा टॉस गमावणे हा एक दुर्मिळ योगायोग मानला जातो. त्यांच्या पाठोपाठ सध्याच्या भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा आणि नेदरलँड्सचा पीटर बोरेन यांनी 11 वेळा सलग नाणेफेक गमावली आहे. (Rohit Sharma losing toss streak)

वनडे क्रिकेट इतिहासात सर्वाधिक सलग नाणेफेक हरणारे कर्णधार (Most consecutive toss losses in ODI cricket)

12: ब्रायन लारा
11: रोहित शर्मा
11: पीटर बोरेन

रोहित शर्मा हा आक्रमक फलंदाज म्हणून ओळखला जातो, पण त्याच्या नेतृत्वाखाली नाणेफेकचा भाग काहीसा कमजोर राहिला आहे. रोहित शर्मा 2023 च्या विश्वचषकांपासून सलग 11 नाणेफेक गमावल्याने हा विक्रम लारानंतर दुसऱ्या क्रमांकावर पोहोचला आहे. रोहितने टाॅस हरला असला तरी, भारतीय संघाला त्याने अनेक यश मिळवून दिले आहेत. मात्र, टाॅस बाबतीत त्याला नशिबाने साथ दिलेली नाही.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया प्लेइंग इलेव्हन- 

भारत: रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, अक्षर पटेल, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पांड्या, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, वरुण चक्रवर्ती

ऑस्ट्रेलिया: कूपर कॉनोली, ट्रॅव्हिस हेड, स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), मार्नस लाबुशेन, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), अ‍ॅलेक्स केरी, ग्लेन मॅक्सवेल, बेन द्वारशुइस, नॅथन एलिस, अ‍ॅडम झांपा, तनवीर संघा

हेही वाचा-

भारतीय संघाला फायनल मध्ये पोहोचवू शकतात हे तीन खेळाडू, कोण ते जाणून घ्या एका क्लिकवर
IND vs AUS: रोहित शर्मानं पुन्हा गमावला टाॅस, ऑस्ट्रेलियाचा फलंदाजीचा निर्णय, पाहा दोन्ही संघाच्या प्लेइंग 11
“स्वतःची लढाई स्वतःच लढावी….”, ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्यापूर्वी श्रेयस अय्यरची मोठी प्रतिक्रिया

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---