विश्वचषक 2023 मध्ये शनिवारी (14 ऑक्टोबर) रोहित शर्मा याने केलेली खेळी प्रत्येक क्रिकेटप्रेमींच्या कायम लक्षात राहील. शतकाला अवघ्या 14 धावा कमी असताना रोहितने इफ्तिखार अहमद याच्या हातात झेल दिला. शाहीन शाह आफ्रिदी याने त्याची विकेट घेतली. भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हा सामना अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला गेला. भारताने 7 विकेट्स राखून विजय मिळवला.
भारताने या सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदोजीचा निर्णय घेतला. हा निर्णय संघातील गोलंदाजांनी अगदी योग्य सिद्ध केला आणि पाकिस्तानला अवघ्या 191 धावांवर सर्वबाद केले. प्रत्युत्तरात रोहित शर्मा याने 63 चेंडूत 86 धावांची वादळी खेळी केली. यातील सहा चौकार आणि सहा षटकारांचा समावेश होता. सलामीला आलेला शुबमन गिल आणि विराट कोहली यांनी प्रत्येकी 16-16 धावांची खेळी केली.
https://www.instagram.com/reel/CyYcgnVsBLc/?utm_source=ig_web_copy_link&igshid=MzRlODBiNWFlZA==
दरम्यान, वनडे विश्वचषकाच्या इतिहासात भारताने पाकिस्तानला आठव्यांदा मात दिली. विशेष म्हणजे पाकिस्तान संघ विश्वचषक स्पर्धेत आतापर्यंत एकदाही भारताला हरवू शकला नाहीये. यावर्षी पाकिस्तन भारताविरुद्ध पहिला विश्वचषक विजय मिळवण्याचे स्वप्न खेऊन मैदानात उतरला, पण यावेळीही त्यांना निराशाच मिळाली. (Rohit Sharma is dismissed by Shaheen Afridi for 86(63) with 6 Fours and 6 Sixes. )
दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन –
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, शार्दुल ठाकूर, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.
पाकिस्तान – अब्दुल्ला शफीक, इमाम-उल-हक, बाबर आझम (कर्णधार), मोहम्मद रिझवान (यष्टीरक्षक), सौद शकील, इफ्तिखार अहमद, शादाब खान, मोहम्मद नवाज, हसन अली, शाहीन आफ्रिदी, हॅरिस रौफ.
महत्वाच्या बातम्या –
विश्वचषकाच्या खास यादीत भारताचे वर्चस्व! पाकिस्तानला 200 धावांच्या आत गुंडाळल्याने यादीतील स्थान भक्कम
इंग्लंड सलग दुसऱ्या विजयासाठी प्रयत्नशील, अफगाणिस्तानचे पहिल्या विजयावर लक्ष