भारत विरुद्ध श्रीलंका संघात विश्वचषक 2023 स्पर्धेचा 33वा सामना खेळला जात आहे. हा सामना मुंबईच्या वानखेडे स्टेडिअमवर सुरू आहे. या सामन्यात भारतीय संघ नाणेफेक गमावत फलंदाजीला उतरला आहे. मात्र, भारताला पहिल्याच षटकात मोठा धक्का बसला आहे. कर्णधार रोहित शर्मा याला दुसऱ्याच चेंडूवर तंबूचा रस्ता पकडावा लागला. यामुळे चाहत्यांच्याही भुवया उंचावल्या आहेत.
कसा झाला बाद?
झाले असे की, भारताकडून डावाची सुरुवात करण्यासाठी रोहित शर्मा आणि शुबमन गिल मैदानावर उतरले होते. यावेळी स्ट्राईकवर रोहित होता. तसेच, श्रीलंकेकडून दिलशान मदुशंका गोलंदाजी करत होता. यावेळी दिलशानच्या पहिल्याच चेंडूवर रोहितने चौकार मारला. मात्र, दुसऱ्याच चेंडूवर दिलशानने रोहितला त्रिफळाचीत बाद केले. त्यामुळे रोहितला 2 चेंडू खेळून 4 धावांवर तंबूचा रस्ता पकडावा लागला. (Rohit Sharma is dismissed in Dilshan Madushanka over ind vs sl cwc 2023)
Rohit Sharma dismissed for 4 from 2 balls. pic.twitter.com/IacOgGck6z
— Johns. (@CricCrazyJohns) November 2, 2023
रोहितची वानखेडे मैदानावरील कामगिरी
विस्फोटक फलंदाजीसाठी ओळखला जाणारा रोहित वानखेडे स्टेडिअमवर खास प्रदर्शन करताना दिसत नाहीये. त्याची वानखेडेवरील मागील वनडे सामन्यांमधील कामगिरी पाहिली, तर रोहितने खूपच सामान्य प्रदर्शन केले आहे. त्याने 2015मध्ये वानखेडेवरील पहिल्या वनडे सामन्यात दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 16 धावा केल्या होत्या. त्यानंतर 2017मध्ये त्याने न्यूझीलंडविरुद्ध 20 धावा केल्या होत्या. तसेच, 2020 मध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध 10 धावा केल्या होत्या आणि आता तो श्रीलंकेविरुद्ध 4 धावांवर बाद झाला.
मागील 4 सामन्यात रोहित शर्माचे वानखेडेवरील प्रदर्शन
16 धावा- विरुद्ध- दक्षिण आफ्रिका (2015)
20 धावा- विरुद्ध- न्यूझीलंड (2017)
10 धावा- विरुद्ध- ऑस्ट्रेलिया (2020)
4 धावा- विरुद्ध- श्रीलंका (2023)*
रोहितची स्पर्धेतील कामगिरी
रोहित शर्मा हा विश्वचषकातील सातवा सामना खेळत आहे. त्याने यापूर्वी खेळलेल्या सहा सामन्यात मोठ्या खेळी केल्या होत्या. मात्र, श्रीलंकेविरुद्ध त्याला खास कामगिरी करता आली नाही. त्याने यापूर्वी खेळलेल्या 6 सामन्यात 66.33च्या सरासरीने 398 धावांचा पाऊस पाडला आहे. यामध्ये त्याने 1 शतक आणि 4 अर्धशतकेही झळकावली आहेत.
हेही वाचा-
वानखेडेवर श्रीलंकेने भारताला दिलं फलंदाजीचं आमंत्रण, रोहितसेनेत कोणताही बदल नाही; पाहा Playing XI
CWC 23: पंड्याच्या पुनरागमनाविषयी रोहितने दिली मोठी माहिती, म्हणाला, ‘आम्हाला दरदिवशी…’