मोहाली। भारत विरुद्ध श्रीलंका (India vs Sri Lanka) संघात शुक्रवारपासून (४ मार्च) दोन सामन्यांच्या कसोटी मालिकेला (Test Series) सुरूवात झाली. या मालिकेतील पहिला सामना पंजाब क्रिकेट असोसिएशनच्या आयएस बिंद्रा स्टेडियमवर होत आहे. या सामन्यात भारतीय संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. या सामन्यातून रोहित शर्मा कसोटी कर्णधार म्हणून नवी सुरुवात करत या पहिल्या सामन्यासाठी नाणेफेकी करता मैदानात उतरताच रोहितने दोन नवे विक्रम आपल्या नावे केले.
श्रीलंकेविरुद्ध रोहित शर्माने कसोटी कर्णधार म्हणून आपला पहिला सामना खेळण्यास सुरुवात केली. रोहित आता तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये भारतीय संघाचा कर्णधार बनला विराट कोहलीने सर्व प्रकारच्या क्रिकेट प्रकारातून कर्णधारपदाचा राजीनामा दिल्यानंतर रोहित ही जबाबदारी सांभाळत आहे.
रोहितने कसोटी कर्णधार म्हणून पहिल्या सामन्यात नाणेफेक जिंकत प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. भारतीय संघासाठी स्वतः रोहित व मयंक अगरवाल सलामीवीर म्हणून मैदानात उतरले. याच बरोबर रोहित वीरेंद्र सेहवागनंतर असा केवळ दुसरा भारतीय कर्णधार बनला, जाने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये कर्णधार असताना भारतीय संघासाठी सलामी दिली आहे.
तसेच, रोहित क्रिकेट इतिहासातील पहिला असा क्रिकेटपटू बनला आहे ज्याने तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये मधल्या फळीतील फलंदाज म्हणून कारकिर्दीची सुरुवात केली होती. मात्र, नेतृत्व करताना तिन्ही प्रकारच्या क्रिकेटमध्ये आपल्या पहिल्या सामन्यात तो सलामीवीर म्हणून मैदानात उतरला. यापूर्वी अशी कामगिरी कोणत्याही खेळाडूला करता आली नव्हती.
आक्रमक सुरुवातीनंतर बाद झाला रोहित
महाल येथे सुरू झालेल्या या सामन्यात रोहितने आक्रमक सुरुवात केली. त्याने सहा चौकारांच्या मदतीने २९ चेंडूवर २८ धावा केल्या. पहिल्या सत्राचा खेळ थांबला तेव्हा भारतीय संघाने २ बाद १०९ धावा केल्या होत्या. आपला शंभरावा कसोटी सामना खेळत असलेला विराट कोहली व हनुमा विहारी मैदानावर नाबाद आहेत.
महत्वाच्या बातम्या-
रोहित वयाच्या ३४ व्या वर्षी बनला कसोटी कर्णधार, या विक्रमात कुंबळेनंतर दुसरा क्रमांक (mahasports.in)