---Advertisement---

आज हिटमॅन रोहित करणार टी२०मधील सर्वात हिट कारनामा

On: बुधवार, नोव्हेंबर 21, 2018 11:25 AM
---Advertisement---

ब्रिस्बेन | भारताच्या बहुचर्चित आॅस्ट्रेलिया दौऱ्याला आज सुरुवात होत आहे. द गाबा, ब्रिस्बने येथे होत असलेल्या टी२० सामन्याने या दौऱ्याची सुरुवात होणार आहे.

तीन टी२० सामन्यांच्या मालिकेतील आजचा हा सामना भारतासाठी खूप अर्थांनी महत्त्वाचा आहे.

या मालिकेत अनेक विक्रम होणार आहे. त्यातील एक महत्त्वाचा विक्रम म्हणजे टी२०मध्ये सर्वाधिक षटकारांचा.

टी२०मध्ये १०० षटकार तसेच सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू होण्याचा मान रोहित शर्माला या मालिकेत मिळू शकतो. रोहितने आजपर्यंत ८७ टी२० सामन्यात ९६ षटकार मारले आहे.

१०० षटकार मारणारा जगातील केवळ तिसरा खेळाडू होण्यासाठी रोहितला ४ षटकारांची गरज आहे. यापुर्वी ख्रिस गेलने ५६ सामन्यात १०३ तर मार्टिन गप्टीलनेही ७५ सामन्यात १०३ षटकार खेचले आहेत.

रोहितने जर पुढच्या मालिकेत किंवा सामन्यात जर ८ षटकार खेचले तर टी२० मध्ये तो सर्वाधिक षटकार मारणारा खेळाडू ठरेल.

आंतरराष्ट्रीय टी२०मध्ये सर्वाधिक षटकार मारणारे खेळाडू-

१०३- ख्रिस गेल, सामने- ५६

१०३- मार्टिन गप्टील, सामने- ७५

९६- रोहित शर्मा, सामने- ८७

९१- ब्रेंडम मॅक्क्युलम, सामने- ७१

८३- काॅलिन मुन्रो, सामने- ४८

महत्त्वाच्या बातम्या:

नाद कॅच! ग्लेन मॅक्सवेलने घेतला २०१८मधील सर्वात जबरदस्त कॅच

अशी गोलंदाजी तूम्ही क्रिकेटमध्ये यापुर्वी १००% पाहिली नसेल

त्यावेळी एमएस धोनी बनला चक्क टीम इंडियाचा ड्राइव्हर!

असे टीम इंडियाच्या बाबतीत पहिल्यांदाच घडले!

महास्पोर्ट्सचे अजित दादांना खुले पत्र

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---

Leave a Comment