---Advertisement---

रोहित शर्माने सुर्यकुमारची प्रतिभा ९ वर्षांपूर्वीच जाणली होती? व्हायरल होतोय ट्विट

On: गुरूवार, ऑक्टोबर 29, 2020 9:39 AM
---Advertisement---

नोव्हेंबरमध्ये सुरु होणाऱ्या भारतीय संघाच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड न झाल्याने मुंबईचा फलंदाज सुर्यकुमार यादव सध्या बराच चर्चेत आहे. त्यातच त्याने बुधवारी(२८ ऑक्टोबर) मुंबई इंडियन्सकडून खेळताना रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरविरुद्ध नाबाद ७९ धावांची विजयी खेळी केल्यानंतर त्याच्याबद्दल बऱ्याच प्रतिक्रिया सोशल मीडियावर उमटल्या. याच दरम्यान मुंबई इंडियन्सचा नियमित कर्णधार रोहित शर्माचा एक जूना ट्विटही व्हायरल होत आहे.

९ वर्षांपूर्वी रोहितने केले होते सुर्यकुमारचे कौतुक

रोहितने ९ वर्षांपूर्वी १० डिसेंबर २०११ रोजी सुर्यकुमारचे कौतुक करणारे एक ट्विट केले होते. त्यात त्याने लिहिले होते की ‘नुकताच चेन्नईमध्ये बीसीसीआय पुरस्कार सोहळा झाला. काही प्रतिभाशाली क्रिकेटपटू पुढे येत आहेत. भविष्यात सुर्यकुमार यादव नक्कीच लक्ष वेधून घेईल.’

रोहितचे हे ट्विट सध्या व्हायरल होत असून त्यावर चाहत्यांच्या अनेक प्रतिक्रिया येत आहेत. काही चाहत्यांनी असेही म्हटले आहे की रोहितने ९ वर्षांपूर्वीच सुर्यकुमारची प्रतिभा ओळखली होती.

https://twitter.com/VKaranam94/status/1321511241114767366

काय आहे नक्की प्रकरण –

२६ ऑक्टोबरला ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघाची निवड करण्यात आली. या दौऱ्यासाठी भारतीय संघात सुर्यकुमारची निवड होईल, असे अनेकांना अपेक्षित होते. मात्र त्याची एकाही भारतीय संघात निवड झाली नाही. त्यामुळे चाहत्यांनाही भारतीय निवड समीतीवर तसेच विराट कोहलीवर टिका केली आहे.

सुर्यकुमारची कामगिरी – 

सप्टेंबर महिन्यात आपला ३०वा वाढदिवस साजरा केलेल्या सुर्यकुमारने प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये ७७ सामन्यात ४४च्या सरासरीने ५३२६ धावा केल्या आहेत. अ दर्जाच्या ९३ सामन्यात त्याने ३५.४६च्या सरासरीने २४४७ धावा केल्या आहेत तर ट्वेंटी-ट्वेंटी प्रकारात त्याने १६१ सामन्यात ३२.१३च्या सरासरीने ३३७४ धावा केल्या आहेत. तसेच आयपीएलमध्ये ९७ सामने खेळलेल्या सुर्यकुमारने २९.८४ च्या सरासरीने १९१० धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या –

-विराटला विराटच्याच भाषेत सुर्यकुमार यादवने दिले उत्तर, पाहा व्हिडीओ

सुर्यकुमारला केलेलं ट्विट माझ्यासाठीही केलं असतं तर माझंही करियर वाचलं असतं!

सूर्यकुमारची ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर निवड न करण्याच्या निर्णयाशी राजीव शुक्ला असहमत? पाहा काय केलं ट्विट

ट्रेंडिंग लेख-

-Top-5 Fielding: निकोलस पूरनच्या फिल्डींगला जाँटी ऱ्होड्सचा सलाम; सचिननेही केली आर्चरवर कमेंट

-SRH विरुद्ध केलेल्या ‘या’ तीन चुकांमुळे DC चं ‘प्ले ऑफ’ तिकीट लांबणीवर

-हैदराबादचे ‘हे’ पाच धुरंदर अख्ख्या दिल्लीवर पडले भारी; मिळवला दणदणीत विजय

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---