इंडियन प्रीमिअर लीगच्या 13 व्या हंगामातील 48 वा सामना बुधवारी (28 ऑक्टोबर) मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात झाला. या सामन्यात मुंबईचा फलंदाज सूर्यकुमार यादवने उत्कृष्ट फलंदाजी केली. यानंतर आयपीएल गव्हर्निंग काउन्सिलचे माजी अध्यक्ष राजीव शुक्ला यांनी त्याच्या या खेळीचे ट्विट करून कौतुक केले आहे. मात्र, ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर त्याची निवड न करण्याबद्दलही त्यांनी नाराजी व्यक्त केली.
संघाला विजय मिळवून देण्यात दिल मोलाचं योगदान
सूर्यकुमार यादवने या सामन्यात 43 चेंडूत 10 चौकार आणि 3 षट्कारांच्या मदतीने नाबाद 79 धावा केल्या. त्याच्या या खेळीमुळेच बेंगलोरने दिलेलं 165 धावांच लक्ष्य मुंबईने 19.1 षटकात सहजपणे गाठलं आणि 5 विकेट्सने विजयही मिळवला.
ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर झाली नव्हती निवड
आयपीएल संपल्यानंतर नोव्हेंबर 2020 मध्ये भारतीय संघ ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणार आहे. काही दिवसांपूर्वी या दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा करण्यात आली होती. मात्र, सातत्याने उत्तम कामगिरी करूनही सूर्यकुमार यादवची या दौऱ्यासाठी एकाही भारतीय संघात निवड करण्यात आली नव्हती.
राजीव शुक्ला यांनी सूर्यकुमारच्या निवडीबाबत केल ट्विट
राजीव शुक्ला यांनी सूर्यकुमारच्या खेळीचे कौतुक केले आहे. त्यांनी ट्विट केले की, “ शानदार प्रदर्शनासाठी मुंबईचे अभिनंदन. सूर्यकुमार यादव या सामन्यात चांगला खेळला. त्याची ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी निवड व्हायला पाहिजे होती.”
Congratulations to @mipaltan for spectacular performance. @surya_14kumar played extremely well. I think he should have been considered for Australia tour @IPL @BCCI #RCBvsMI
— Rajeev Shukla (@ShuklaRajiv) October 28, 2020
ट्विटमध्ये बीसीसीयला केल टॅग
राजीव शुक्ला यांनी केलेल्या ट्विटमध्ये त्यांनी बीसीसीआयला टॅग केल आहे. यामुळे सूर्यकुमार यादवची ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर निवड न केल्यामुळे ते बीसीसीआयच्या निर्णयाशी असहमत असल्याचे समजते.
महत्त्वाच्या बातम्या-
सूर्यकुमारच्या धमाकेदार फलंदाजीने पळवलं आरसीबीच्या तोंडच पाणी; प्लेऑफ तिकीट खिशात
ट्रेंडिंग लेख-
Top-5 Fielding: निकोलस पूरनच्या फिल्डींगला जाँटी ऱ्होड्सचा सलाम; सचिननेही केली आर्चरवर कमेंट
SRH विरुद्ध केलेल्या ‘या’ तीन चुकांमुळे DC चं ‘प्ले ऑफ’ तिकीट लांबणीवर
हैदराबादचे ‘हे’ पाच धुरंदर अख्ख्या दिल्लीवर पडले भारी; मिळवला दणदणीत विजय