---Advertisement---

अब आयेगा मजा! रोहित झाला ऑस्ट्रेलियाला रवाना; खेळणार ‘इतके’ कसोटी सामने

On: मंगळवार, डिसेंबर 15, 2020 5:28 PM
---Advertisement---

अनेक अफवा आणि अटकळींना पूर्णविराम देत भारताच्या मर्यादित षटकांच्या क्रिकेट संघाचा उपकर्णधार रोहित शर्मा आगामी कसोटी मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाला रवाना झाल्याचे वृत्त समोर आले आहे. आज (१५ डिसेंबर) पहाटे त्याने ऑस्ट्रेलियासाठी उड्डाण केल्याची माहिती मिळाली आहे. रोहित आज रवाना झाल्यामुळे कसोटी मालिकेतील अखेरच्या दोन कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध होऊ शकतो.

दुबईमार्गे झाला रवाना
सूत्रांच्या माहितीनुसार, रोहित शर्मा पहाटे दुबईमार्गे ऑस्ट्रेलियाला रवाना झाला आहे. ऑस्ट्रेलियात पोहोचल्यानंतर तो क्वारंटाईन कालावधीत आपल्या तंदुरुस्तीवर काही मेहनत घेईल. क्वारंटाईन कालावधी पूर्ण केल्यानंतर, तो ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या चार कसोटी सामन्यांच्या मालिकेतील अखेरच्या दोन कसोटी सामन्यांसाठी उपलब्ध असेल.”

आयपीएल दरम्यान झाली होती दुखापत
रोहितला युएईमध्ये झालेल्या आयपीएल २०२० वेळी हॅमस्ट्रींगची दुखापत झाली होती. त्यामुळे तो तीन सामन्यांमध्ये सहभागी होऊ शकला नव्हता. त्याच वेळी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर जाणाऱ्या भारतीय संघाची घोषणा झाली. त्यात रोहित शर्माचा समावेश केला गेला नव्हता. रोहितची निवड न झाल्याने बराच वाद निर्माण झाला होता. अखेरीस, निवडसमितीने रोहितचा समावेश कसोटी संघात केला.
दरम्यान, रोहितने आयपीएलमधील अखेरच्या साखळी सामन्यातून मैदानावर पुनरागमन केले. त्यानंतरही संघाला अंतिम फेरीत विजय मिळवून देताना अर्धशतक झळकावले. मुंबई इंडियन्सने विक्रमी पाचव्यावेळी आयपीएलचे विजेतेपद मिळवले होते.

रोहितने घेतले द्रविडचे मार्गदर्शन
भारताचे इतर खेळाडू ऑस्ट्रेलियाला पोहोचल्यानंतर ही रोहित भारताचा माजी खेळाडू आणि राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचा संचालक राहुल द्रविडच्या मार्गदर्शनाखाली बेंगलोर येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत तंदुरुस्ती मिळवण्याचा प्रयत्न करत होता. रोहित ऑस्ट्रेलियाला कधी जाणार आणि किती सामने खेळणार? या सर्व प्रश्नांना आज पूर्णविराम मिळाला आहे.

संबधित बातम्या:
– मैदानात पुन्हा येणार हिटमॅनचं वादळ! ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी रोहित होणार आज रवाना
– भारतीय संघासाठी खुशखबर! रोहित शर्मा ऑस्ट्रेलिया दौर्‍यावर जाण्यास सज्ज
– रोहितच्या निवडीबाबत सचिनचे मोठे वक्तव्य; म्हणाला

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---