भारताचा दक्षिण आफ्रिका दौरा नुकताच पार पडला. या दौऱ्यात भारताचा एकदिवसीय आणि टी२० संघाचा कर्णधार रोहित शर्मा दुखापतीमुळे जाऊ शकला नव्हता. त्याच्या गैरहजरीत भारताने दक्षिण आफ्रिकेविरुद्धची कसोटी मालिका २-१ ने तर एकदिवसीय मालिका ३-० ने गमावली. वेस्ट इंडिजविरुद्धच्या मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. रोहित शर्मा आता पुर्णपणे तंदुरुस्त झाला असून भारताच्या वेस्ट इंडिजसोबतच्या एकदिवसीय आणि टी २० मालिकेसाठी त्याला संघात निवडण्यात आले आहे. त्याने प्रॅक्टीससुद्धा सुरु केली आहे.
बंगळुरू येथे राष्ट्रीय क्रिकेट ऍकॅडमीमध्ये रोहित शर्मा सराव करताना दिसला आहे. त्यावेळी तो पुर्णपणे तंदुरुस्त झालेला दिसत नाही. त्याने वजन खुप कमी केले आहे. रोहित शर्माला एनसीएकडून फिटनेसवर जास्त काम करण्यास सांगण्यात आले आहे.
रोहित शर्माच्या फिटनेसवर बोलताना बीसीसीआय अधिकारी म्हणाले, “रोहित शर्मा आता पुर्णपणे तंदुरुस्त आहे. वेस्ट इंडिज मालिकेपूर्वी सर्व खेळाडू बंगळुरूला येतील तेथे सर्वांची फीटनेस चाचणी केली जाईल.”
तसेच एनसीए फीटनेस एक्सपर्टने रोहित शर्माला गुडघे आणि हॅमस्टिंगवर कमी दबाव यावा म्हणून वजन कमी करण्याचा सल्ला दिला होता. त्यामुळे त्याने ५-६ किलो वजन कमी केले आहे. सध्या रोहित शर्माचा फोटो ही सोशल मिडीयावर व्हायरल होत आहे. त्या फोटोमध्ये त्याचे वजन पूर्वीपेक्षा खूपच कमी दिसत आहे.
https://www.instagram.com/p/CY6I7Q4BX_O/
वेस्ट इंडिज संघ पुढील महिन्यात भारत दौऱ्यावर येणार आहे. ६ फेब्रुवारीपासून भारत आणि वेस्ट इंडीज यांच्यामध्ये तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका आणि तीन सामन्यांची आंतरराष्ट्रीय टी२० मालिका खेळली जाणार आहे. या दोन संघांमध्ये पहिला एकदिवसीय सामना ६ फेब्रुवारीला, दुसरा सामना ९ फेब्रुवारीला तर तिसरा सामना ११ फेब्रुवारीला होणार आहे. हे सामने अहमदाबाद येथे पार पडणार आहेत.
तसेच टी२० मालिकेतील पहिला सामना १६ फेब्रुवारी, दुसरा सामना १८फेब्रुवारी आणि तिसरा सामना २० फेब्रुवारीला होणार आहेत. हे सामने कोलकाचा येथे खेळले जाणार आहेत.
महत्त्वाच्या बातम्या –
शेवटचे षटक, १२ धावांची गरज अन् २ चेंडूंवर गेल्या २ विकेट्स, सिडनी सिक्सर्सची अशी फायनलमध्ये धडक
खरेदीदार आहे का? ‘हा’ प्रसिद्ध भारतीय क्रिकेटपटू बिटकॉइनसाठी विकतोय ट्विटर अकाऊंट, वाचा सविस्तर