Rohit Sharma Update About INDvsSL ODI Series:- यशस्वी झिम्बाब्वे दाैऱ्यानंतर भारतीय संघ आता दोन मालिकांसाठी श्रीलंका दाैरा (India Tour Of Sri Lanka) करणार आहे. भारतीय संघ या दौऱ्यावर तीन टी20 आणि तीन वनडे सामने खेळणार आहे. तर यासाठीचा भारतीय संघ अद्याप जाहीर झालेला नाही. बुधवारी (17 जुलै) बीसीसीआय या दौऱ्यावर जाणाऱ्या संघाची घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात होती. मात्र, आता त्याबाबत एक महत्त्वाची बातमी समोर येत आहे.
श्रीलंका दौऱ्यापासून भारतीय क्रिकेटचा एक नवा अध्याय सुरू होईल. राहुल द्रविड यांच्यानंतर संघाला आता गौतम गंभीर याच्या रूपाने नवा प्रशिक्षक लाभला आहे. तर रोहित शर्मा (Rohit Sharma) याने टी20 क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केल्याने, भारतीय संघाला नवा टी20 कर्णधार देखील मिळेल.
या दौऱ्यावरील मालिकांसाठी भारतीय संघाची घोषणा बुधवारी होण्याची शक्यता होती. मात्र, काही कारणांमुळे आता ही बैठक गुरुवारी होऊ शकते. सध्या तरी रोहित शर्मा हा वनडे मालिकेतून पुनरागमन करण्याची शक्यता आहे. यापूर्वी आलेल्या बातम्यांमध्ये, रोहित हा या दौऱ्यावर देखील विश्रांती करू शकतो असे म्हटले जात होते. त्यामुळे संघाचा कर्णधार म्हणून केएल राहुल व श्रेयस अय्यर यांच्या नावाची चर्चा सुरू झालेली. रोहित मालिकेसाठी उपलब्ध असेल तर तो थेट कर्णधार म्हणून खेळेल.
निवड समिती, मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर व कर्णधार रोहित शर्मा हे व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे बैठक करत संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. चॅम्पियन ट्रॉफी 2025 च्या दृष्टीने ही मालिका महत्त्वाची ठरते. या आयसीसी स्पर्धेआधी भारतीय संघाला केवळ सहा वनडे सामने खेळलेला मिळणार आहेत. त्यामुळे एक मजबूत संघ उतरवण्याचा प्रयत्न संघ व्यवस्थापन करेल.
हार्दिक पंड्या याने यापूर्वीच वैयक्तिक कारणाने वनडे मालिकेतून माघार घेतली आहे. तर विराट कोहली व जसप्रीत बुमराह वर्क लोड मॅनेजमेंटमुळे या मालिकेत खेळण्याची शक्यता कमी वाटते. इतर सर्व खेळाडू मालिकेसाठी उपलब्ध राहणार आहेत.
महत्वाच्या बातम्या-
ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकीचा सुवर्ण इतिहास, जाणून घ्या आतापर्यंत किती पदकं जिंकली
IND VS SL: कर्णधार म्हणून सूर्याचीच हवा, तर हार्दिक पांड्या जवळपासही नाही, पाहा कॅप्टन म्हणून दोघांची कामगिरी
टीम इंडियाच्या दौऱ्यापूर्वी श्रीलंकेच्या माजी कर्णधाराची गोळ्या झाडून हत्या