भारत विरुद्ध विंडीज संघात आज (24 आॅक्टोबर) दुसरा वनडे सामना होणार आहे. या सामन्यात भारताचा सलामीवीर फलंदाज रोहित शर्माला मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा एक खास विक्रम मोडण्याची संधी आहे.
रोहितने जर या सामन्यात 2 षटकार मारले तर तो वनडेमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय फलंदाजांच्या यादीत दुसऱ्या क्रमांकावर येईल.
सध्या तो या यादीत तिसऱ्या क्रमांकावर असून त्याने आत्तापर्यंत 189 सामन्यात 194 षटकार मारले आहेत. तसेच या यादीत सध्या दुसऱ्या क्रमांकावर 195 षटकारांसह सचिन तेंडुलकर आहे.
त्याचबरोबर या यादीत अव्वल क्रमांकावर भारताचा माजी कर्णधार एमएस धोनी आहे. त्याने आत्तापर्यंत 327 वनडे सामन्यात 217 षटकार मारले आहेत. तसेच तो वनडेत सर्वाधिक षटकार मारणाऱ्या जगातील एकूण फलंदाजांमध्ये चौथ्या क्रमांकावर आहे.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या जगातील एकूण फलंदाजांमध्ये अव्वल क्रमांकावर पाकिस्तानचा शाहिद आफ्रिदी आहे. त्याने 398 सामन्यात 351 षटकार मारले आहेत.
सलामीवीर फलंदाज म्हणून सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांमध्ये रोहित अव्वल क्रमांकावर आहे. त्याने सलामीवीर फलंदाज म्हणून वनडेमध्ये 171 षटकार मारले आहेत. तसेच त्याच्या पाठोपाठ सचिनने सलामीवीर फलंदाज म्हणून 167 षटकार मारले आहेत.
वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणारे भारतीय फलंदाज-
217 – एमएस धोनी
195 – सचिन तेंडुलकर
194 – रोहित शर्मा
190 – सौरव गांगुली
155 – युवराज सिंग
महत्त्वाच्या बातम्या:
–दुसऱ्या वनडेतही कोहली ठरणार किंग, आरामात करणार हे ३ विक्रम आपल्या नावावर
–असे एक कारण ज्यामुळे युवराजचा २०१९ विश्वचषकातील पत्ता होणार कट
–विराट कोहली सचिनप्रमाणेच ४० वर्षांपर्यंत खेळणार, जाणुन घ्या काय आहे कारण?