Rohit Sharma Record :- भारत आणि श्रीलंका (India vs Sri Lanka) यांच्यात 3 सामन्यांच्या मालिकेतील दुसरा सामना खेळला जात आहे. हा सामना कोलंबोच्या आर प्रेमदासा स्टेडियम येथे होतो आहे. या सामन्यात यजमान संघानं नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना भारतासमोर 241 धावांचे आव्हान ठेवले. या धावांचा पाठलाग करताना भारताला कर्णधार रोहित शर्मा (Indian Captain Rohit Sharma) याने वेगवान सुरुवात केली. त्याने तुफानी अर्धशतक साजरे करताना एक मोठा विक्रम बनवला.
विजयासाठी मिळालेल्या 241 धावांचा पाठलाग करताना रोहितने श्रीलंकन गोलंदाजांवर हल्ला चढवला. पहिल्या सामन्याप्रमाणे त्याने इथे देखील झंझावाती अर्धशतक पूर्ण केले. त्याने केवळ 29 चेंडूंमध्ये 5 चौकार व 3 षटकारांच्या मदतीने अर्धशतक झळकावले. पहिल्या सामन्यात त्याने फक्त 33 चेंडूंमध्ये अर्धशतक झळकावले होते.
या खेळी दरम्यान रोहित भारतासाठी वनडे क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा बनवणाऱ्या खेळाडूंच्या यादीत चौथ्या स्थानी पोहचला. त्याने माजी भारतीय कर्णधार राहुल द्रविड याचा 10768 धावांचा विक्रम मागे टाकला. या यादीमध्ये पहिल्या स्थानी सचिन तेंडुलकर हा आहे. सचिनने आपल्या कारकिर्दीत 18426 वनडे धावा केल्या होत्या. तर विराट कोहली हा 13872 धावांसह दुसऱ्या स्थानी आहे. त्यानंतर तिसऱ्या स्थानी असलेल्या सौरव गांगुली याच्या नावे 11221 धावा आहेत. तर, सहाव्या क्रमांकावरील एमएस धोनी याने 10599 धावा केल्या आहेत. आगामी काळात रोहितला या यादीत तिसऱ्या क्रमांकावर जाण्याची संधी असेल.
या सामन्यात श्रीलंकेनं टाॅस जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. श्रीलंकेनं भारतासमोर 241 धावांचे आव्हान ठेवले आहे. श्रीलंकेसाठी फर्नांडो व कामिंदू यांनी प्रत्येकी 40 धावा केल्या. तर, भारतीय संघासाठी सर्वाधिक तीन बळी वॉशिंग्टन सुंदर याने घेतले. उभय संघातील पहिला सामना बरोबरीत सुटला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
कॅच घेतल्यानंतर केला बिहू डान्स, विराट कोहलीचं अनोखं सेलिब्रेशन तुफान व्हायरल
IND vs SL निर्णायक सामन्यात श्रीलंकेचं भारतासमोर 241 धावांचं आव्हान
IND vs SL पहिल्या चेंडूवर विकेट घेवून मोहम्मह सिराजनं रचला इतिहास..!