आशिया चषक २०२२ (Asia Cup 2022) ला शनिवारपासून (२७ ऑगस्ट) सुरुवात होत आहे. भारतीय संघ दुसऱ्या दिवशी पाकिस्तान विरुद्ध आपल्या मोहिमेला सुरुवात करेल. दुबई येथे होणारा भारत-पाकिस्तान (INDvPAK) सामना आज स्पर्धेतील सर्वात हाय व्होल्टेज सामना ठरू शकतो. याच सामन्यात भारतीय कर्णधार रोहित शर्मा याच्याकडे मोठा विश्वविक्रम करण्याची संधी असेल.
भारतीय कर्णधार रोहित शर्मा याची गणना जगातील सर्वोत्तम टी२० फलंदाजांमध्ये केली जाते. रोहित व न्यूझीलंडचा सलामीवीर मार्टिन गप्टिल यांच्यात सातत्याने टी२० सर्वाधिक धावा काढण्याच्या बाबतीत चढाओढ सुरू असते. आता रोहितकडे त्या विक्रमाव्यतिरिक्त आणखी एक मोठा विक्रम करण्याची आयती संधी चालून आली आहे. रोहित या मानाच्या स्पर्धेत आणखी १० षटकार ठोकू शकला तर, आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वाधिक षटकार ठोकणारा फलंदाज बनेल.
रोहित शर्माने आतापर्यंत आपल्या आंतरराष्ट्रीय टी२० कारकिर्दीत ३४८७ धावा केल्या आहेत. यादरम्यान त्याने विरोधी गोलंदाजांविरुद्ध १६३ षटकार ठोकलेत. आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वाधिक धावा (३४९७) करणारा मार्टिन गप्टिल सर्वाधिक षटकार ठोकण्याच्या यादीतही पहिल्या स्थानी आहे. त्याने आतापर्यंत १७२ षटकार मारले आहेत. आंतरराष्ट्रीय टी२० मध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांत वेस्ट इंडिजचा ख्रिस गेल १२४ तर इंग्लंडचा ओएन मॉर्गन १२० षटकारांसह चौथ्या क्रमांकावर आहे.
आशिया चषकात रोहित शर्मा दुसऱ्यांदा संघाचे नेतृत्व करत आहे. त्याच्याच नेतृत्वात भारतीय संघाने २०१८ मध्ये वनडे प्रकाराचा आशिया चषक जिंकला होता. एमएस धोनीनंतर वनडे व टी२० प्रकाराचा आशिया चषक विजेता कर्णधार होण्याचे आव्हान त्याच्यासमोर असेल.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा-
महत्वाच्या बातम्या –
अँडरसनचा नाद नाय राव! एकाच देशात खेळलेत तब्बल १०० सामने
हरभजनला मारायला हॉटेलच्या रूमपर्यंत गेलेला अख्तर, ‘या’ गोष्टीमुळे पेटला होता वाद
WBC: ‘भारताच्या स्वप्नांचा चुरडा!’ सायना नेहवाल प्री-क्वाटर सामन्यात पराभूत