विराट कोहली आणि ऑफ स्टंप लाईन बॉल ही एक वेगळीच प्रेमकथा आहे. हा दिग्गज फलंदाज ऑफ स्टंप लाईनवर कव्हर ड्राईव्ह खेळण्याचा नादात अनेकदा आऊट झालेला आहे. सध्याच्या बॉर्डर-गावस्कर मालिकेत देखील कोहलीनं या पद्धतीनं आपली विकेट गमावली. आता मेलबर्नमध्ये खेळल्या जाणाऱ्या बॉक्सिंग डे कसोटीपूर्वी भारतीय कर्णधार रोहित शर्माला विराट कोहलीच्या अशा पद्धतीनं बाद होण्याबाबत विचारण्यात आलं. यावर रोहितनं अतिशय मजेशीर उत्तर दिलं आहे.
पत्रकार परिषदेत विराट कोहलीबाबत विचारलेल्या प्रश्नाला भारतीय कर्णधारानं हसतहसत उत्तर दिलं. कोहलीसारखे आधुनिक काळातील महान खेळाडू स्वत:चा मार्ग स्वत: शोधतात, असं रोहित म्हणाला. म्हणजेच विराट कोहलीला त्याच्या समस्येवरचे उपाय माहित असल्याचं रोहित शर्मानं स्पष्ट केलं आहे.
बॉर्डर-गावस्कर मालिकेच्या तीन सामन्यांमध्ये विराट कोहलीच्या बॅटमधून जास्त धावा आलेल्या नाहीत. त्यानं पर्थमध्ये खेळलेल्या पहिल्या कसोटीच्या दुसऱ्या डावात शतक ठोकलं होतं. मात्र त्यानंतर तो ॲडलेड आणि गाबा कसोटीच्या दोन्ही डावात फ्लॉप झाला. आता मेलबर्न येथील चौथ्या कसोटीत विराट कोहलीकडून मोठ्या खेळीची अपेक्षा आहे.
मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवरील विराट कोहलीच्या आकडेवारीबद्दल बोलायचं झाल्यास, त्यानं येथे खेळलेल्या तीन कसोटी सामन्यांमध्ये 52.66 च्या सरासरीनं 316 धावा केल्या आहेत. या दरम्यान त्याच्या बॅटमधून 1 शतक आणि 2 अर्धशतकं निघाली. या मैदानावरील कोहलीचा सर्वोत्कृष्ट स्कोर 169 धावा आहे.
बॉर्डर-गावस्कर मालिकेचे आतापर्यंत तीन सामने झाले आहेत. मालिकेतील चौथा कसोटी सामना 26 डिसेंबरपासून खेळला जाईल, जो ‘बॉक्सिंग डे कसोटी’ या नावाने ओळखला जातो. भारतीय वेळेनुसार हा सामना पहाटे 5 वाजता सुरू होईल.
हेही वाचा –
कुलदीप, अक्षरच्या आधी तनुष कोटियनचा टीम इंडियात का प्रवेश? रोहित शर्माने सांगितले मोठे कारण
चॅम्पियन्स ट्राॅफी पूर्वी इंग्लंडला धक्का! कसोटी कर्णधार बेन स्टोक्स गंभीर दुखापती
रोहित शर्माने दुखापतीबाबत दिला मोठा अपडेट, जाणून घ्या चौथी कसोटी खेळणार की नाही?