भारतीय संघाचा स्फोटक सलामीवीर आणि सध्याचा टी२० संघाचा कर्णधार रोहित शर्माने नुकतीच ऑस्ट्रेलियाचा सर्वकालिन सर्वोत्कृष्ट संघाची निवडली आहे. या संघात त्याने ३ वेगवान गोलंदाज, १ फिरकीपटू आणि १ अष्टपैलू खेळाडूचा समावेश केला आहे.
हेडन आणि वॉर्नर सलामीवीर
रोहित शर्माने या संघात सलामीवीर म्हणून मॅथ्यू हेडन आणि डेव्हिड वॉर्नर या स्फोटक सलामीच्या जोडीची निवड केली आहे. संघात ही सलामीची जोडी निवडण्यामागील कारण स्पष्ट करताना रोहित म्हणाला, ”हेडन टॉप ऑर्डरमध्ये खूप स्फोटक फलंदाज असू शकतो. त्यामुळेच मी त्याला माझ्या संघात ठेवले आहे. याशिवाय वॉर्नरही हेडनसारखाच आहे.
रिकी पाँटिंगकडे संघाची कमान
रोहित शर्माने ऑस्ट्रेलियाचा सर्वकालिन सर्वोत्कृष्ट संघाच्या नेतृत्त्वाची कमान ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार रिकी पाँटिंगकडे सोपवली आहे. रोहित म्हणाला, रिकी पाँटिंगने, ज्या प्रकारे वर्चस्व गाजवले ते आश्चर्यकारक आहे. दरम्यान, आश्चर्याची बाब म्हणजे रोहितने ऑस्ट्रेलियाचा महान कर्णधार स्टीव्ह वॉला आपल्या संघात स्थान दिलेले नाही.
रोहित शर्माने निवडलेला ऑस्ट्रेलियाचा सर्वकालीन सर्वोत्तम संघ-
मॅथ्यू हेडन, डेव्हिड वॉर्नर, रिकी पाँटिंग (कर्णधार), मायकेल क्लार्क, मायकेल हसी, शेन वॉटसन, ऍडम गिलख्रिस्ट (यष्टीरक्षक), ब्रेट ली, ग्लेन मॅकग्रा, मिचेल जॉन्सन, शेन वॉर्न.
महत्त्वाच्या बातम्या –
वनडे कारकिर्दीत सर्वाधिक धावा देणारे ३ भारतीय गोलंदाज
आपल्या कामगिरीचा जगभर डंका वाजवूनही भारताचे नेतृत्त्व करण्याची संधी न मिळालेले ३ दिग्गज
‘हलाल मांस’ विवादावर बीसीसीआयने सोडले मौन, कोषाध्यक्ष अरुण धुमाळ यांनी दिले स्पष्टीकरण