इंडियन प्रीमियर लीगच्या पंधराव्या हंगामात बरेच दिग्गज क्रिकेटपटू फेल ठरताना दिसत आहे. एकीकडे सर्वांना विराट कोहलीच्या अर्धशतकाची प्रतिक्षा असताना रोहित शर्मा साधे अर्धशतक करण्यासाठीही झगडताना दिसतोय. आयपीएलच्या चालू हंगामात ११ सामने खेळताना त्याने २० पेक्षाही कमी सरासरीने धावा काढल्या आहेत. त्यामुळे मुंबई इंडियन्सच्या पराभवासाठी कुठे-ना-कुठे रोहितही जबाबदार आहे, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.
१९ डावांनंतरही अर्धशतक नाही
आयपीएलच्या पंधराव्या (IPL 2022) हंगामात रोहितच्या (Rohit Sharma) फलंदाजीला सुरुंग लागला आहे. हंगामातील मुंबई संघाच्या पहिल्या सामन्यात रोहितची बॅट चांगलीच तळपली होती. त्याने ३२ चेंडूत ४१ धावांची ताबडतोब खेळी करत संघाला चांगली सुरुवात करून दिली होती. परंतु त्याला स्वत:चे अर्धशतक (Half Century) पूर्ण करता आले नव्हते. त्यानंतर त्याचा फॉर्म आणखीनच खालावला आणि तो साध्या दुहेरी धावाही करण्यासाठी (Rohit Sharma Flop) झगडताना दिसला.
त्याने आयपीएल २०२२मधील ११ सामन्यांमध्ये अनुक्रमे ४१, १०, ०३, २६, २८, ०६, शून्य, ३९, ०२, ४३, ०२ धावा केल्या आहेत. अतिशय निराशाजनक अशा १८.१८ च्या सरासरीने त्याच्या बॅटमधून या धावा आलेल्या आहेत. महत्त्वाचे म्हणजे, रोहितच्या अर्धशतकाचा दुष्काळ फक्त याच हंगामात नव्हे तर मागील हंगामापासून सुरू आहे. तो गेल्या १९ सामन्यांपासून आयपीएलमध्ये अर्धशतक करू शकलेला नाही.
रोहितचा मुंबई संघही ठरलाय सपशेल फेल
पाच वेळा आयपीएलचे विजेतेपद पटकावणाऱ्या मुंबईसाठी(Mumbai Indians) हा हंगाम खूपच खराब गेला आहे. जबरदस्त खेळाडूंचा समावेश असूनही त्यांना हा हंगाम गाजवता आलेला नाहीये. मुंबईने आतापर्यंत या हंगामातील ११ सामने खेळले आहेत. त्यात त्यांनी फक्त २ सामन्यात विजय मिळवला आहे. त्यांना उर्वरित ९ सामन्यात पराभवाचा धक्का सहन करावा लागला आहे. या निराशाजनक प्रदर्शनासह मुंबई संघ चालू हंगामात प्लेऑफच्या शर्यतीतून बाहेर पडणारा पहिला संघ बनला आहे. ही मुंबईने आजवरच्या आयपीएल इतिहासात केलेली सर्वात वाईट कामगिरी आहे.
महा स्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रुप जॉइन करण्यासाठी इथे क्लिक करा
महत्त्वाच्या बातम्या-
दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या टी२० मालिकेपूर्वी जखमी सूर्यकुमारची चाहत्यांसाठी भावूक पोस्ट, म्हणतोय…
टी२० विश्वचषकापूर्वी भारत दौऱ्यावर येणार ऑस्ट्रेलिया, खेळणार टी२० मालिका; पाहा कधी होणार सामने?