---Advertisement---

विजयी मिरवणुकीनंतर रोहित शर्माची मराठमोळ्या भाषेत प्रतिक्रिया, पाहा व्हिडिओ

On: शुक्रवार, जुलै 5, 2024 11:53 AM
---Advertisement---

टीम इंडिया बीसीसीआयने पाठवलेल्या विशेष विमानाने बार्बाडोसहून  काल (4 जुलै) दिल्लीमध्ये सकाळी 6 वाजता पोहचली. भारतीय संघ पंतप्रधान मोदींंची भेट घेऊन दुपारी मुंबईकडे रवाना झाला. भारतीय संघ ज्या विमानाने दिल्लीहुन मुंबईला पोहचला होता त्या विमानाला वाॅटर सेल्यूट देण्यात आले. त्यानंतर विमानतळापासून टीम इंडिया मारिन लाईन पर्यंत बसमध्ये पोहचली. त्यानंतर वानखेडे स्टेडियम पर्यंत भारतीय खेळाडूंसाठी खुल्या बसमधून विजयी परेड करण्यात आले. या विजयी मिरवणुकीनंतर रोहित शर्माने मराठी भाषेत आपली प्रतिक्रिया देताना पहायला मिळाला.

टीम इंडिया वानखेडे स्टेडियमवर पोहचल्यानंतर बीसीसीआये झाहीर केलेल्या 125 कोटी रुपयांचे बक्षीस वितरण करणायत आले. यानंतर मीडियाशी बोलताना रोहित शर्मा मराठी भाषेत म्हणाला, “या विजयांमुळे खूप आनंदी आहे. भारतीय संघ 11 वर्षानंतर आयसीसी ट्राॅफी जिंकल्यामुळे देशभरात खुशी आहे.  यादरम्यान एका पत्रकाराने निवृत्ती बद्दल परत विचाक करावा आणखी एक विश्वचषक खेळावा असा चाहत्यांचा अट्टहास आहे तर परत येणार का असे प्रश्न  विचारले असता, तो म्हणाला नाय नायं योग्य वेळी मी निवृत्ती घेतली आहे.

रोहित शर्मा पुढे बोलताना म्हणाला, 11 वर्षानंतर ट्राॅफी इंडियामध्ये आली आहे. त्यामुळे सर्वजण खूश आहेत. त्यामुळे यावर आपण नाचायला पाहिजे असंही तो म्हणाला. दोन्ही टी20 विश्वचषकाच्या साम्यता बद्दल विचारले असता तो म्हणाला, 2007 आणि हा टी20 विश्वचषक जिंकल्यांचा दोन्हींचा तितकाच आनंदी आहे.

Rohit’s interview in Marathi man ????❤️ pic.twitter.com/eRifyv5iMP

— Sachin (@Malevolntx) July 4, 2024

तत्तपूर्वी भारतीय संघ यंदाच्या टी20 विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात दक्षिण आफ्रिकेवर 7 धावांनी रोमहर्षक विजय मिळवला होता. या विजयानंतर टीम इंडिया 2 टी20 विश्वचषक जिंकणारा केवळ तिसरा देश ठरला आहे. अंतिम सामन्यात विराट कोहलीला सामानावीरचा पुरस्कार देण्यात आले होते.

महत्वाच्या बातम्या-

टीम इंडियाच्या विमानाला पाण्याचा वर्षाव! पाहा वॉटर सॅल्यूट असतं तरी काय?
‘विक्ट्री परेड’ची सुरुवात कधी आणि कशी झाली? टीम इंडियाची पहिली विजय परेड कधी झाली होती?
बुमराहचा मुलगा मोदींच्या कडेवर, पंतप्रधानांच्या भेटीचा फोटो सोशल मीडियावर तुफान व्हायरल

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---