---Advertisement---

रोहितचं नाव होणार अजरामर, शतकांच्या विक्रमापासून केवळ दोन पावलं दूर ‘हिटमॅन’!

On: रविवार, जुलै 21, 2024 3:25 PM
Rohit Sharma (1)
---Advertisement---

टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मा पुढील महिन्यात श्रीलंकेविरुद्ध सुरू होणाऱ्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेत इतिहास रचू शकतो. भारत आणि श्रीलंका यांच्यातील तीन सामन्यांची वनडे मालिका 2 ऑगस्ट ते 7 ऑगस्ट दरम्यान कोलंबोमध्ये खेळली जाईल. याआधी 27 जुलै ते 30 जुलै दरम्यान दोन संघांमध्ये तीन सामन्यांची टी20 मालिका खेळली जाणार आहे. रोहित शर्मानं आंतरराष्ट्रीय टी20 मधून निवृत्ती घेतली असून तो फक्त कसोटी आणि एकदिवसीय फॉरमॅटमध्ये भारताचा कर्णधार आहे.

श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेदरम्यान जर रोहित शर्मा 2 शतकं झळकावण्यात यशस्वी ठरला, तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचा मोठा विक्रम करेल. रोहित शर्मा आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 शतकं पूर्ण करणार आहे. असं झाल्यास हा विक्रम करणारा तो केवळ तिसरा भारतीय फलंदाज ठरेल.

भारतासाठी आतापर्यंत फक्त सचिन तेंडुलकर आणि विराट कोहली यांनी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 50 पेक्षा जास्त शतकं झळकावली आहेत. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सचिन तेंडुलकरच्या नावावर 100 आणि विराट कोहलीच्या नावावर 80 शतकं आहेत. रोहित शर्माच्या नावावर सध्या आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये 48 शतकं आहेत. जर रोहितनं श्रीलंकेविरुद्धच्या वनडे मालिकेत आणखी दोन शतकं झळकावली, तर तो आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये शतकांचं अर्धशतक पूर्ण करणारा जगातील नववा फलंदाज ठरेल.

आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक शतकं

(1) सचिन तेंडुलकर (भारत) – 100
(2) विराट कोहली (भारत) – 80
(३) रिकी पाँटिंग (ऑस्ट्रेलिया) – 71
(4) कुमार संगकारा (श्रीलंका) – 63
(5) जॅक कॅलिस (दक्षिण आफ्रिका) – 62
(6) हाशिम आमला (दक्षिण आफ्रिका) – 55
(7) महेला जयवर्धने (श्रीलंका) – 54
(8) ब्रायन लारा (वेस्ट इंडिज) – 53
(9) डेव्हिड वॉर्नर (ऑस्ट्रेलिया) – 49
(10) रोहित शर्मा (भारत) – 48

महत्त्वाच्या बातम्या – 

हार्दिक पांड्याच्या गोलंदाजीवर प्रश्नचिन्ह, चॅम्पियन्स ट्रॉफीपूर्वी होणार चाचणी
व्हीव्हीएस लक्ष्मणला आयपीएलमध्ये मिळू शकते मोठी जबाबदारी, या संघाकडून मिळणार ऑफर!
शेवटच्या सामन्यात शतक…तरीही संजू सॅमसनला संघातून का वगळलं?

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---