---Advertisement---

‘हिटमॅन’ रोहित षटकारांच्या विक्रमात दिग्गज कपिल देव यांना पछाडणार, ठोकावा लागणार फक्त…

On: सोमवार, ऑगस्ट 23, 2021 1:45 PM
rohit-sharma-test
---Advertisement---

लॉर्ड्स येथे दुसऱ्या कसोटी सामन्यात यजमान इंग्लंडला १५१ धावांनी नमवत पाहुण्या भारताने कसोटी मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. यानंतर २५ ऑगस्टपासून उभय संघांमध्ये लीड्सच्या हेडिंग्ले मैदानावर तिसरा कसोटी सामना रंगणार आहे. या सामन्यात इंग्लंड आणि भारत संघातील क्रिकेटपटूंना जुने विक्रम मोडण्याची आणि नवे विक्रम करण्याची संधी असणार आहे. ‘हिटमॅन’ नावाने ओळखला जाणारा भारतीय सलामीवीर रोहित शर्मा याच्याकडेही मोठा किर्तीमान करण्याची संधी असणार आहे. तो या सामन्यात भारताचे माजी दिग्गज कपिल देव यांना मागे टाकू शकतो.

विस्फोटक सलामीवीर रोहितने कसोटी क्रिकेटमध्ये आतापर्यंत ६१ षटकार मारले आहेत. याबाबतीत तो सध्या माजी अष्टपैलू कपिल देव यांच्यासह बरोबरीवर आहे. त्यामुळे जर रोहितने तिसऱ्या कसोटी सामन्यात एक किंवा अधिक षटकार ठोकले तर कपिल देव यांना पिछाडीवर सोडेल.

कसोटीत सर्वाधिक षटकार मारण्याच्या कामगिरीत भारताकडून माजी फलंदाज विरेंद्र सेहवाग प्रथमस्थानी आहे. त्याने १०४ कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक ९१ षटकार मारले आहेत. त्याच्यानंतर माजी भारतीय कर्णधार एमएस धोनी ७८ षटकारांसह दुसऱ्या स्थानावर आहे. त्याने ९० कसोटी सामन्यात हा कारनामा केला आहे. तर मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर २०० कसोटी सामन्यात ६९ षटकारांसह तिसऱ्या स्थानावर विराजमान आहे. यानंतर रोहित कपिल देव यांच्यासह संयुक्तपणे चौथ्या स्थानावर आहे.

दरम्यान रोहितने मागील दुसऱ्या कसोटी सामन्यात लॉर्ड्स येथे पहिल्या डावात १ विक्रमी षटकार मारला होता. या डावात त्याने ८३ धावांची झुंजार खेळी खेळली होती. दुसऱ्या डावातही १ षटकार मारत तो कपिल देव यांच्या कसोटीतील षटकारांच्या किर्तीमानात बरोबरीवर आला होता. या सामन्यातील उपयुक्त खेळीनंतर रोहित लीड्समध्ये किती षटकारांचा पाऊस पाडतो?, हे पाहाणे रोमांचक ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

अनुभवहीन भारतीय शिलेदारांची हेडिंग्लेवर ‘खरी कसोटी’; सर्व ११ खेळाडू करणार डेब्यू

‘परफ्यूम बाॅल’ नक्की आहे तरी काय? ज्याने नेपाळचा गोलंदाज गुलशन झाचे पालटले नशीब

एका बाऊन्सरने नेपाळच्या ‘या’ गोलंदाजाला आणलं प्रकाशझोतात, थेट राष्ट्रीय संघात झाली निवड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---