आशिया चषक 2023मध्ये युझवेंद्र चहल याच्यासह काही खेळाडूंना संधी मिळणे चाहत्यांना अपेक्षित होते. मात्र, निवडकर्ते आणि संघ व्यवस्थापनाकडून या नावांचा आशिया चषकासाठी विचार केला गेला नाही. याच पार्श्वभूमीवर नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत रोहित शर्मा याला प्रश्न विचारला गेला. यावर रोहितने खास उत्तर दिले.
आशिया चषक 2023 येत्या 30 तारखेला सुरू होणार असून वनडे विश्वचषकाची सुरुवात 5 ऑक्टोबर रोजी होणार आहे. आशिया चषकासाठी नविडेला संघ विश्वचषकासाठी जवळपास निश्चित मानला जात आहे. अशात युझवेंद्र चहल (Yuzvendra Chahal) आणि रविचंद्रन अश्विन (Ravichandran Ashwin) या फिरकीपटू गोलंदाजांना वनडे विश्वचषकात संधी मिळण्याची शक्यता नाहीच्या बरोबर दिसते. या दोघांसह भुवनेश्वर कुमार आणि शिखर धवन यांनाही संधी मिलण्याची कुठलीच शक्यता नाहीये. संघात आपल्या आपडत्या खेळाडूला संधी न मिळाल्यामुळे संघ व्यवस्थापन निवडकर्ते आणि कर्णधार रोहित शर्मा याच्यावर टीका होत आहे.
याविषयी रोहित शर्मा (Rohit Sharma) याने आपले मत सविस्तर मांडले. रोहितच्या मते विश्वचषकासाठीच्या संघात निवड होणे सोपे नसते. तो म्हणाला, “विश्वचषक संघातील निवड खूप कठीण असते. प्रशिक्षक राहुल द्रविड आणि मी खेळाडूंना ही गोष्ट समजवण्याचा आतापर्यंत पूर्ण प्रयत्न केला आहे की, ते संघात का नाहीत. जेव्हा कधी संघ आणि प्लेइंग इलेव्हन निवडली जाते, तेव्हा आम्ही खेळाडूंशी समोरा समोर बोलतो. एक-एक करून सर्वांना त्यांना न निवडण्याचे कारण सांगितले जाते. असे नाहीये की, मला एखादा व्यक्ती आवडत नाही म्हणून त्याला संघातून बाहेर काढले जाते. कर्णधारपद वैयक्तिक पसंत-नापसंतीवर चालत नाही.”
भारताने 2011 साली एमएस धोनी याच्या नेतृत्वात दुसरी वनडे विश्वचषक ट्रॉफी जिंकली होती. रोहित या संघाचा भाग होता. पण त्याला खेळण्याची संधी मिळाली नव्हती. त्यावेळी नक्कीच रोहित देखील निराश झाला होता. पण सहकारी खेळाडू युवराज सिंग याने त्यावेळी रोहितला धीर दिला होता. रोहित याविषयी म्हणाला की, “संघात नाव नसल्यामुळे मी माझ्या खोलीत बसलो होतो आणि आता पुढे काय, याचे उत्तर माझ्याकडे नव्हते. मला लक्षात आहे युवारजाने त्यावेळी मला त्याच्या खोलीत बोलावून घेतले आणि जेवणासाठी बाहेर घेऊन गेला. त्याने मला सांगितले की, तुझ्याकडे अजून वेळ आहे. आपल्या शैलीवर काम कर आणि पुनरागमन कर. तू नक्कीच भारतासाठी खेळशील आणि विश्वचषक खेळण्याची संधीही मिळेल.”
दरम्यान, यावर्षीचा वनडे विश्वचषक भारतात होणार असल्यामुळे भारतीय संघाला मायदेशातील परिस्थितीचा फायदा मिळू शकतो. भारतातील एकून 10 स्टेडियमवर विश्वचषक संघाचे समाने आयोजित केले जाणार आहेत. (Rohit Sharma responds to Yuzvendra Chahal not being included in Asia Cup squad)
महत्वाच्या बातम्या –
‘भारतातील विश्वचषक भारताने जिंकावा…’, दिग्गज महिला खेलाडूची मोठी प्रतिक्रिया
Asia Cup 2023 साठी जसप्रीत बुमराह तयार, नव्या हेअरस्टाईलची सर्वत्र चर्चा