---Advertisement---

“रोहितच्या दुखापतीचा फायदा घेऊ”, क्वालिफायर सामन्याआधी दिल्लीच्या दिग्गजाची चेतावणी

On: गुरूवार, नोव्हेंबर 5, 2020 12:41 PM
---Advertisement---

इंडियन प्रीमियर लीग 2020 मध्ये गुरुवारी (5 नोव्हेंबर) पहिला क्वालिफायर सामना होणार आहे. हा सामना मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्स यांच्यात होईल. मुंबईचा कर्णधार रोहित शर्माने हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीतून सावरत हैदराबादविरुद्ध झालेल्या सामन्यातून पुनरागमन केले होते. पण आता क्वालिफायरचा सामना खेळण्याआधी दिल्लीचा सलामीवीर शिखर धवनने रोहितच्या फॉर्मबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे आणि सामन्यातील रणनीतीबद्दल भाष्य केले आहे.

आयपीएलमधील मागील काही सामन्यांना मुकला होता रोहित 
डाव्या पायाला झालेल्या हॅमस्ट्रिंगच्या दुखापतीमुळे रोहित आयपीएलमध्ये दोन आठवडे खेळू शकला नव्हता. सनरायझर्स हैदराबादविरुद्ध मंगळवारी (3 नोव्हेंबर) झालेल्या सामन्यात त्याने पुनरागमन केले.

रोहितच्या दुखापतीचा घेऊ शकतो फायदा 

धवन म्हणाला की रोहित हा एक चांगला खेळाडू आहे आणि मागील काही सामन्यात तो खेळला नाही. त्यामुळे मला त्याच्या फॉर्मबद्दल कल्पना नाही. आम्ही याचा नक्कीच फायदा घेऊ शकतो. धवन म्हणाला की, “माझ्या शुभेच्छा त्याच्यासमवेत आहेत, परंतु विरोधी संघात असल्याने आम्ही त्याच्या दुखापतीचा फायदा घेऊ शकतो आणि त्यानुसार आम्ही आमची रणनीती बनवू.”

ऑस्ट्रेलियामध्ये टिकवून ठेवणार फॉर्म 

दुखापतीमुळे रोहितची नोव्हेंबर 2020 मध्ये होणाऱ्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यासाठी भारतीय संघात निवड झालेली नाही. परंतु राष्ट्रीय संघात दीर्घ काळापासून खेळत असलेला रोहितचा जोडीदार धवन म्हणाला की, “मी ऑस्ट्रेलियामध्येही आयपीएलमधील आपला चांगला फॉर्म टिकवून ठेवू इच्छित आहे.”

ऑस्ट्रेलियात खेळायला आवडते -धवन 

आयपीएलमध्ये आतापर्यंत 14 डावात 525 धावा करणारा धवन पुढे म्हणाला की, “एकदा तुम्ही मोठी धावसंख्या करायला सुरुवात केली की पुढच्या मालिकेतही त्या फॉर्ममध्ये सातत्य राखण्याची तुमची इच्छा असते. मला ऑस्ट्रेलियामध्ये खेळायला आवडते. तेथील खेळपट्ट्या खूप चांगल्या आहेत आणि मला ऑस्ट्रेलिया संघाची गोलंदाजी खेळण्यात आनंद वाटतो. ही एक खास मालिका असेल, कारण भारतीय संघ बर्‍याच दिवसानंतर खेळणार आहे. मला तिथे चांगली कामगिरी करायची आहे.”

पृथ्वीला सकारात्मक राहण्याची गरज 
धवनने खराब कामगिरी करणाऱ्या सलामीवीर पृथ्वी शॉची बाजू घेतली आहे. पृथ्वीने मागील सहा सामन्यांत 4,0, 0, 7, 10 आणि 9 धावा केल्या आहेत. याबद्दल बोलताना धवन म्हणाला की, “कोणत्याही फलंदाजाचा फॉर्म खराब होण्याची ही पहिलीच वेळ नाही आणि ही शेवटची वेळ नाही. त्याला शांत राहण्याची गरज आहे. हे प्रत्येक फलंदाजांसोबत होते. तो अचूक टाईमिंगने फटके खेळत आहे. त्याला सकारात्मक राहण्याची आणि त्याच्या क्षमतांवर विश्वास ठेवण्याची आवश्यकता आहे.”

…ही गोष्ट प्रथमच घडली 

धवनला विचारले गेले की, आयपीएल कारकिर्दीतील हा त्याचा सर्वोत्कृष्ट हंगाम आहे का? या प्रश्नावर तो म्हणाला की, “मी आयपीएलमध्ये प्रथमच 500 धावा केल्या नाहीत. मी हे यापूर्वीही केले आहे. होय, मी सलग दोन शतके ठोकली आणि त्यानंतर सलग दोन वेळा शून्यावर बाद झालो. ही गोष्ट प्रथमच घडली.”

महत्त्वाच्या बातम्या – 

मुंबई इंडियन्सच्या विजयासाठी रोहित शर्मा सोडणार का सलामीची जागा ?

“रोहितची पुन्हा तंदुरुस्ती चाचणी घेण्यात गैर नाही”, माजी दिग्गजाचे रोखठोक मत

संघात स्थान देण्यासाठी एकेकाळी वडिलांकडे मागितली लाच, खुद्द विराटनेच केला खुलासा

ट्रेंडिंग लेख –

‘बर्थडे बॉय’ विराट कोहलीबद्दल माहित नसलेल्या १५ गोष्टी!

टेकडीचा हिमालय होताना!

हॅप्पी बर्थडे विराट …!!!

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---