भारत विरुद्ध इंग्लंड संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांची मालिका खेळली जात आहे. या मालिकेतील पहिला कसोटी सामना ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या दोन्ही दिवशी भारतीय खेळाडूंचा दबदबा राहिला. सुरुवातीला गोलंदाजांनी चांगली गोलंदाजी करून १८३ धावांवर फलंदाजांचा डाव संपुष्ठात आणला. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भारतीय सलामीवीरांनी संघाला चांगली सुरुवात करून दिली होती.
दरम्यान भारतीय संघाचा हिटमॅन रोहित शर्माला चांगली सुरुवात मिळूनही तो मोठी खेळी करू शकला नाही. त्यामुळे तो बाद झाल्यानंतर त्याच्यावर टीका केली जात आहे. मात्र रोहित शर्माने त्याच्यावर टीका करणाऱ्यांना सडेतोड उत्तर दिले आहे.
मयंक अगरवाल दुखापतीमुळे पहिल्या कसोटी सामन्यातून बाहेर झाला आहे. त्यामुळे केएल राहुलला रोहित शर्मासोबत डावाची सुरुवात करण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. ही जबाबदारी त्याने योग्यरीत्या पार पाडली. केएल राहुल अर्धशतकी खेळी करून मैदानात आहे. तर रोहित शर्मा १०७ चेंडूंमध्ये ३६ धावांची खेळी करत माघारी परतला. इंग्लडच्या गोलंदाजांविरुद्ध त्याने संथ सुरुवात करत राहुलसोबत मिळून ९७ धावांची भागिदारी रचली.
मात्र ऑली रॉबिन्सनने रोहित शर्माला शॉर्ट चेंडू टाकला, ज्यावर त्याने पूल शॉट मारला. परंतु तो चेंडू सोमारेषा पार करू शकला नाहीय सीमारेषेवर सॅम करणने त्याचा झेल टिपला आणि त्यांची भागिदारी तुटली. त्यांनतर रोहित शर्माच्या या शॉटवर अनेकांनी टीका केली आहे. (Rohit sharma says if ball is in my area I will hit)
परंतु रोहित शर्माने स्वत:चा बचाव करत म्हटले की, “त्यांचे गोलंदाज खूप शिस्तबद्ध होते. त्यामुळे नेहमी शॉट खेळण्यासाठी सज्ज राहावे लागते. दरम्यान जो चेंडू माझ्या क्षेत्रात होता, ज्यावर मी चौकार किंवा षटकार मारणारच. मी आणि राहुल फलंदाजी करताना याच रणनीतीचा अवलंब करत होतो. जेव्हा आम्हाला वाटायचे की आता एक दोन शॉट खेळायला हवे, तेव्हा आम्ही शॉट खेळत होतो. असे करत असताना बाद झाल्यावर वाईट तर वाटतेच. परंतु त्याच चेंडूवर बाद झालो नसतो तर चौकार किंवा षटकार मिळवता आला असता. जर चेंडू ४ किंवा ५ पाऊल ईकडे तिकडे पडला असता तर, काहीही होऊ शकले असते.”
दुसऱ्या दिवसाचा खेळ पावसामुळे थांबवण्यात आला होता. तोपर्यंत भारतीय संघाच्या धावा ४ बाद १२५ इतक्या झाल्या आहेत. केएल राहुल नाबाद ५७ तर रिषभ पंत नाबाद ७ धावांसह मैदानावर आहेत.
महत्वाच्या बातम्या-
अनुभवी गोलंदाज ईशांतला नॉटिंघम कसोटीत का मिळाली नाही जागा? गंभीर कारण आले पुढे
चांगल्या सुरुवातीनंतरही रोहित अवघ्या ३६ धावांवर झेलबाद, मैदान सोडताना स्वत:वरच काढला राग
किती उत्साह म्हणायचा! पंत मैदानात उतरताच दिग्गज क्रिकेटर जोमात; म्हणाले, ‘आता फक्त हल्लाबोल’






