वनडे विश्वचषक स्पर्धेचा अंतिम सामना रविवारी (19 नोव्हेंबर) अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळला जात आहे. भारताला नाणेफेक गमावल्यानंतर प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले गेले. कर्णधार रोहित शर्मा याने संघाला चांगली सुरुवात दिली, पण अर्धशतकापूर्वी बाद झाला. असे असले तरी, त्याच्या नावावर विश्वचषक इतिहासातील मोठ्या विक्रमाची नोंद झाली.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांनी विश्वचषक 2023 मध्ये अप्रतिम फॉर्म दाखवला आहे. रोहित शर्मा याचे वैयक्तिक प्रदर्शन देखील चांगले राहिले. पण अनेकदा त्याने झटपट धावा करण्याच्या नादात विकेट गमावला. रविवारी (19 नोव्हेंबर) विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात देखील रोहितने संघाला वेगवान सुरुवात मिळवून दिली. शुबमन गिल याच्या रुपात संघाला पहिला झटका बसल्यानंतर रोहित आणि विराट कोहली खेळट्टीवर होते. दोघांमध्ये अर्धशतकी भागीदारी होणारच होती, पण तितिक्यात रोहितने विकेट गमावली.
संघाची धावसंख्या 30 असताना डावातील पाचव्या षटकात शुबमन गिल झेलबाद झाला. रोहितच्या रुपात डावातील 10व्या षटकात भारताला दुसरा झटका बसला. रोहितने 31 चेंडूत वैयक्तिक 47 धावांची खेळी केल्यानंतर विकेट गमावली. ट्रेविस हेड याने अप्रतिम झेल घेत त्याची विकेट घेतली. रोहितला अर्धशतकी खेळी करता आली नसली, तरी वनडे विश्वचषकाच्या एका हंगामात तो सर्वाधिक धावा करणारा कर्णधार बनला आहे. न्यूझीलंडचा दिग्गज केन विलियम्सन याचा विक्रम त्याने रविवारी मोडीत काढला. (Rohit Sharma scored the most runs in the World Cup season as a captain)
वनडे विश्वचषक हंगामात सर्वाधिक धावा करणारे कर्णधार
582 – रोहित शर्मा (2023)*
578 – केन विलियम्सन (2019)
548 – माहेला जयवर्धने (2007)
539 – रिकी पाँटिंग (2007)
507 – ऍरॉन फिंच (2019)
विश्वचषकाच्या अंतिम सामन्यासाठी दोन्ही संघांची प्लेइंग इलेव्हन
भारत – रोहित शर्मा (कर्णधार), शुबमन गिल, विराट कोहली, श्रेयस अय्यर, केएल राहुल (यष्टीरक्षक), सूर्यकुमार यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, कुलदीप यादव, मोहम्मद सिराज
ऑस्ट्रेलिया – ट्रेविस हेड, डेविड वॉर्नर, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्नस लॅब्युशेन, ग्लेन मॅक्सवेल, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), पॅट कमिन्स (कर्णधार), मिचेल स्टार्क, ऍडम झाम्पा, जोश हेझलवूड (World Cup 2023 IND vs AUS final Toss See playing XI Here)
महत्वाच्या बातम्या –
World Cup 2023 Final: अर्धशतक हुकलं, पण इतिहास घडवला! वनडेत रोहितने केली ‘हा’ जबरदस्त विक्रम करण्याची डेरिंग
WC Finalचा निकाल लागण्यापूर्वीच युवराजने निवडला आपला Player of the Tournament, रोहित-विराटला दिला धक्का