राजकोट। उद्या(7 नोव्हेंबर) भारत विरुद्ध बांगलादेश संघात दुसरा टी20 सामना(2nd T20I) सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशन स्टेडियम, राजकोट(Saurashtra Cricket Association Stadium, Rajkot) येथे पार पडणार आहे. हा सामना भारताचा प्रभारी कर्णधार रोहित शर्मासाठी(Rohit Sharma) खास ठरणार आहे.
हा सामना रोहितचा आंतरराष्ट्रीय क्रिकेट कारकिर्दीतील 100 वा टी20(100th T20I) सामना ठरणार आहे. त्यामुळे 100 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळणारा तो पहिला आणि सध्याचा एकमेव भारतीय क्रिकेटपटू ठरणार आहे.
त्याचबरोबर 100 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळणारा तो जगातील दुसराच क्रिकेटपटू ठरेल. सध्या केवळ पाकिस्तानचा क्रिकेटपटू शोएब मलिकने 100 पेक्षा अधिक टी20 सामने खेळले आहेत. त्याने 111 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत.
सध्या सर्वाधिक आंतरराष्ट्रीय टी20 सामने(Most T20I Matches) खेळणाऱ्या क्रिकेटपटूंच्या यादीत रोहित शर्मा शाहिद आफ्रिदीसह संयुक्तरित्या दुसऱ्या क्रमांकावर आहे. या दोघांनीही प्रत्येकी 99 आंतरराष्ट्रीय टी20 सामने खेळले आहेत.
#आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक सामने खेळणारे क्रिकेटपटू –
111 – शोएब मलिक (पाकिस्तान)
99 – शाहिद आफ्रिदी (पाकिस्तान)
99 – रोहित शर्मा (भारत)
98 – एमएस धोनी (भारत)
93 – रॉस टेलर (न्यूझीलंड)
#आंतरराष्ट्रीय टी20मध्ये सर्वाधिक सामने खेळणारे भारतीय क्रिकेटपटू –
99 – रोहित शर्मा
98 – एमएस धोनी
78 – सुरेश रैना
72 – विराट कोहली
58 – युवराज सिंग