इंडियन प्रीमीयर लीगचा यावर्षी १५ वा हंगाम खेळवला जाणार आहे. या हंगामापूर्वी १२ आणि १३ फेब्रुवारी रोजी मेगा लिलाव झाला. बेंगलोर येथे झालेल्या या लिलावात अनेक दिग्गज खेळाडूंना कोट्यावधी रुपयांची बोली लागलेली पाहाला मिळाली. या लिलावात गुजरात टायटन्स आणि लखनऊ सुपरजायंट्स या दोन नव्या संघांनीही जुन्या ८ संघांसह सहभाग घेतला होता. त्यामुळे एकूण १० संघात खेळाडूंना खरेदी करण्यासाठी चांगलीच चुरस पाहायला मिळाली. त्याचवेळी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्मा याने आपल्या इंस्टाग्राम हॅण्डलवरून एक छायाचित्र पोस्ट केले आहे. ज्यामध्ये सर्व खेळाडू लक्षपूर्वक आयपीएल लिलाव पाहताना दिसत आहेत.
रोहितने शेअर केले छायाचित्र
भारतीय क्रिकेट संघ सध्या अहमदाबाद येथे आहे. भारतीय संघाने नुकतीच वेस्ट इंडिज विरुद्धची वनडे मालिका ३-० अशा फरकाने जिंकली. त्यानंतर उभय संघांमध्ये टी२० मालिका कोलकाता येथे खेळली जाईल. तत्पूर्वी, संघातील सर्व खेळाडू अत्यंत एकाग्रतेने आयपीएल लिलावावर लक्ष ठेवून आहेत. भारतीय संघाचा कर्णधार व आयपीएलमध्ये मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करणारा रोहित शर्मा याने एक छायाचित्र शेअर केले.
तुला किती रे?#IPLMegaAuction2022 pic.twitter.com/O0i4YSoFQ1
— Mahesh (@MaheshMGW23) February 12, 2022
https://instagram.com/stories/rohitsharma45/2771881955504621075?utm_source=ig_story_item_share&utm_medium=share_sheet
या छायाचित्रामध्ये युजवेंद्र चहल, ईशान किशन, श्रेयस अय्यर, शार्दुल ठाकुर, रिषभ पंत व सूर्यकुमार यादव हे दिसत आहेत. रोहितने या छायाचित्राला ‘काही तणावग्रस्त व काही आनंदी चेहरे’ असे कॅप्शन दिले आहे.
यापैकी श्रेयस अय्यर याला कोलकाता नाईट रायडर्स संघाने १२ कोटी २५ लाख रुपयांची बोली लावत आपल्या ताफ्यात सामील करून घेतले. तो मार्की खेळाडूंच्या लिलावातील सर्वात महागडा खेळाडू ठरला.
महत्वाच्या बातम्या-
IPL Auction: डेव्हिड वॉर्नरची घरवापसी! दिल्ली कॅपिटल्सने ‘एवढ्या’ कोटींसह घेतले विकत (mahasports.in)