भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील दुसरा कसोटी सामना, लॉर्ड्सच्या ऐतिहासिक मैदानावर पार पडला. या सामन्यात भारतीय गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी करत भारतीय संघाला १५१ धावांनी विजय मिळवून दिला. या विजयासह भारतीय संघाने ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेत १-० ने आघाडी घेतली आहे. दरम्यान रोहित शर्माने विजयानंतर केलेल्या ट्विटची जोरदार चर्चा होत आहे.
भारतीय संघाचा स्फोटक फलंदाज रोहित शर्मा पत्रकार परिषदेत त्याच्या दिलखुलास उत्तरांसाठी ओळखला जातो. भारत विरुद्ध इंग्लंड कसोटी सामन्यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत त्याने इंग्लंडविरुद्धच्या दुसऱ्या कसोटीचा पहिला दिवस संपल्यानंतर पत्रकार परिषदेत पत्रकाराने विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सलाम केला होता.
एका पत्रकाराने पत्रकार परिषदेत रोहितला प्रश्न केला की, जर भारत दुसऱ्या कसोटीत इंग्लंडला हरवले, तर संपूर्ण देशाने ७५ वा स्वातंत्र्य दिन साजरा करण्याचे एक मोठे कारण भेटेल का? ज्याच्या उत्तरादाखल, रोहित शर्माने सलाम करत दाद दिली होती. भारतीय स्वातंत्र्यदिनी इंग्लंडविरुद्धची दुसरी कसोटी जिंकण्यात यश मिळवले तर ही एक अद्भुत आणि मोठी गोष्ट असेल आमच्यासाठी असेही तो म्हटला होता.
नेमका ह्याच उत्तराचा भाग, रोहितने ट्विट केला आहे. या ट्विटला ‘देर आए दुरुस्त आए’ असे कॅपशन देत पुढे म्हटले आहे की, लॉर्ड्सवरील अविस्मरणीय विजय आणि उत्कृष्ट सांघिक कामगिरी. त्याने ट्विटरवर शेअर केलेल्या व्हिडिओला देशभक्तीपर गाण्याचे संगीत असल्याने तो व्हिडीओ चाहत्यांना अधिक भावत आहे.
देर आए दुरुस्त आए! 🇮🇳
Brilliant win at Lord’s. Proper team show. A memorable one! pic.twitter.com/1qKQJumLoN
— Rohit Sharma (@ImRo45) August 16, 2021
दरम्यान, दुसऱ्या कसोटीच्या पहिल्या डावात रोहित शर्माने ८३ धावा केल्या होत्या. त्याची लॉर्ड्सवर शतक साजरे करण्याची संधी थोडक्यात हुकली होती. परंतु, शतकवीर केएल राहुलसह महत्वपूर्ण शतकी भागीदारी केली होती. दुसऱ्या डावात तो मोठी धावसंख्या उभी करण्यास अयशस्वी राहिला होता.
महत्त्वाच्या बातम्या –
दिल्ली कॅपिटल्सकडून खेळलेला ‘हा’ खेळाडू म्हणतोय, ‘मला मुंबई इंडियन्सकडून खेळायचंय’
बिग ब्रेकिंग! टी२० विश्वचषकाचे संपूर्ण वेळापत्रक घोषित; ‘या’ दिवशी होणार भारताचे सामने
सिराजची विक्रमी कामगिरी! लॉर्ड्सवर ३९ वर्षांपूर्वी कपिल देवच्या ‘त्या’ पराक्रमाची केली बरोबरी