दुबईत मंगळवारी (१० नोव्हेंबर) आयपीएल २०२० मधील अंतिम सामन्यात मुंबई इंडियन्सने दिल्ली कॅपिटल्सवर ५ विकेट्सने विजय मिळवला होता. या विजयासह त्यांनी आयपीएलचे पाचवे विजेतेपद जिंकले. या हंगामात मुंबई संघाने दिमाखदार कामगिरी केली. अंतिम सामन्यापूर्वी असे म्हटले जात होते की, मुंबई इंडियन्स संघ ऑड (विषम) वर्षात विजेतेपद जिंकते. त्यामुळे यावर्षी मुंबई आयपीएलचे विजेतेपद जिंकू शकत नाही. परंतु कर्णधार रोहित शर्माच्या नेतृत्त्वातील मुंबई संघाने हे खोटे ठरवले.
आयपीएल सुरू होण्यापूर्वी जाहिरातीत रोहितचे वक्तव्य
खरं तर आयपीएलचा हंगाम सुरू होण्यापूर्वी एक जाहिरात करण्यात आली होती. यात रोहित शर्माही होता. यामध्ये म्हटले जात आहे की, मुंबई इंडियन्स संघ केवळ विषम वर्षामध्येच आयपीएलचे विजेतेपद जिंकते.
हा व्हिडिओ मार्चमध्ये ट्विटरवर शेअर करत रोहित शर्माने म्हटले होते की, “मी घड्याळाची वाट पाहत आहे की, ते केव्हा योग्य वेळ दाखवेल. या आयपीएल हंगामात इव्हन (सम) करण्याची आवश्यकता आहे.” यासोबतच रोहितने जाहिरातीमध्ये म्हटले की, “आयपीएल १३ हादेखील एक विषम नंबर आहे. अशामध्ये लोक तुम्हाला मामू बनवत आहेत.”
https://twitter.com/ImRo45/status/1235543581714071554
मार्च महिन्यात शेअर केलेला हा व्हिडिओ रोहितने पुन्हा एकदा आयपीएलचे विजेतेपद जिंकल्यानंतर शेअर केला आहे. यावेळी रोहितने लिहिले की, “या हंगामातही आपण खरोखर इव्हनच होतो. म्हणलं होतं मामू, यांचं गणित कमजोर आहे.”
We indeed went even this season. Bola tha aapko mamu inki ganit weak hai 😁😁 @mipaltan @StarSportsIndia https://t.co/W81Cp0U29m
— Rohit Sharma (@ImRo45) November 12, 2020
यापूर्वी विषम वर्षात जिंकले होते आयपीएलचे विजेतेपद
मुंबईने सर्वाधिक वेळा आयपीएलचे विजेतेपद जिंकण्याचा मान पटकावला आहे. त्यांनी यापूर्वी २०१३, २०१५, २०१७, २०१९ या विषम वर्षात आयपीएलचे विजेतेपद जिंकले होते.
महत्त्वाच्या बातम्या-
-….म्हणून इयत्ता नववीच्या वर्गातच रोहित बनला होता शालेय संघाचा कर्णधार
-‘ड्वेन ब्रावो तू आता माझ्या मागे राहिलास’, असे का म्हणाला पोलार्ड, घ्या जाणून
-“आता खूप झालं, आता काही वर्ष थांबा”, भारतीय दिग्गज क्रिकेटपटूचा मुंबई इंडियन्सला सल्ला