---Advertisement---

चांगल्या सुरुवातीनंतरही रोहित अवघ्या ३६ धावांवर झेलबाद, मैदान सोडताना स्वत:वरच काढला राग

On: शुक्रवार, ऑगस्ट 6, 2021 10:55 AM
---Advertisement---

भारत विरुद्ध इंग्लंड या दोन्ही संघांमध्ये ५ कसोटी सामन्यांच्या मालिकेतील पहिल्या कसोटी सामना ट्रेंट ब्रिजच्या मैदानावर खेळला जात आहे. या सामन्यातील पहिल्या दोन दिवसात भारतीय संघातील खेळाडूंनी अप्रतिम कामगिरी केली आहे. पहिल्या दिवशी गोलंदाजांनी चांगली कामगिरी केल्यानंतर दुसऱ्या दिवशी फलंदाजांनाही चांगल्या धावा करण्यात यश आले आहे. दरम्यान भारतीय सलामीवीर फलंदाज रोहित शर्मा कमी धावांवर बाद झाल्यानंतर निराश झाल्याचे पाहायला मिळाले आहे.

या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी भारतीय वेगवान गोलंदाजांनी अप्रतिम गोलंदाजी प्रदर्शन केले होते. परिणामी इंग्लंड संघाचा डाव अवघ्या १८३ धावांवर संपुष्टात आला होता. प्रत्तुतरात भारतीय संघाला देखील चांगली सुरुवात मिळाली होती.

भारतीय संघाकडून रोहित शर्मा आणि केएल राहुल यांनी डावाची सुरुवात केली होती. रोहितने संथ सुरुवात करत धावा जोडल्या होत्या. परंतु त्याला मोठी खेळी साकारता आली नाही. इंग्लंडचा वेगवान गोलंदाज ऑली रॉबिन्सन याने शॉर्ट चेंडू टाकला, ज्यावर रोहित शर्माने पुल शॉट मारला. परंतु तो चेंडू जास्त दूर जाऊ शकला नाही. सीमारेषेवर क्षेत्ररक्षण करत असलेल्या क्षेत्ररक्षकाने तो झेल टिपला आणि रोहित शर्मा अवघ्या ३६ धावा करत माघारी परतला.

तब्बल १०७ चेंडूंचा सामना केल्यानंतर मैदानावर सेट झालेल्या रोहितला कमीतकमी अर्धशतकी खेळीची आस असावी. मात्र रोहित केवळ ३६ धावांवर झेलबाद झाल्यानंतर खूप निराश झाल्याचे पाहायला मिळाले होते. त्याने आपली बॅट जोराने हवेत फिरवत संताप व्यक्त केला. त्यानंतर मैदान सोडून जातानाही तो स्वत:शी पुटपुटत राग व्यक्त करताना दिसला. (Rohit sharma shows frustration after failing to Maximize his start again)

https://twitter.com/rishobpuant/status/1423253838614597640?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1423253838614597640%7Ctwgr%5E%7Ctwcon%5Es1_c10&ref_url=https%3A%2F%2Fwww.crictracker.com%2Feng-vs-ind-rohit-sharma-shows-frustration-after-failing-to-maximize-his-start-again%2F

https://twitter.com/rajsharmamohit/status/1423260406529683457?s=20

भारतीय संघासाठी डावाची सुरुवात करताना केएल राहुल आणि रोहित शर्मा या दोघांनी मिळून ९७ धावांची भागीदारी केली होती. रोहित शर्मा बाद झाल्यानंतर केएल राहुलने एक बाजू धरून ठेवली होती. परंतु त्याला इतर कुठल्याही फलंदाजाची साथ मिळाली नाही. भारतीय कर्णधार विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि चेतेश्वर पुजारा हे तिघेही स्वस्तात माघारी परतले. दरम्यान पावसामुळे दुसऱ्या दिवसाचा खेळ लवकर थांबवण्यात आला. हा सामना थांबवण्यापूर्वी केएल राहुल नाबाद ५७ आणि रिषभ पंत नाबाद ७ धावांवर फलंदाजी करत होते. भारतीय संघाला दुसऱ्या दिवसाखेर आतापर्यंत ४ बाद १२५ धावा करण्यात यश आले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

किती उत्साह म्हणायचा! पंत मैदानात उतरताच दिग्गज क्रिकेटर जोमात; म्हणाले, ‘आता फक्त हल्लाबोल’

अन् इंग्लंडच्या प्रशिक्षकाचा आनंद एका क्षणात बदलला दु:खात, बघा नक्की असं काय घडलं?

पूर्ण जगापुढे ‘या’ माजी क्रिकेटरची पोलखोल, वयाच्या ५१ व्या वर्षीही बनवायच्या आहेत नवनव्या गर्लफ्रेंड

Join WhatsApp

Join Now

Join Telegram

Join Now
---Advertisement---