एशिया कप स्पर्धेचे आयोजक असलेल्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने या स्पर्धेचे आयोजन राजकीय कारणास्तव भारताबाहेर संयुक्त अरब अमीराती येेथे केले. स्पर्धेतील सामने दुबई आणि अबूधाबी येथे आयोजित केेले. सुपर फोरमधील भारतीय संघाचे सामने दुबईत चालू आहेत .
काल (23 सप्टेंबर) झालेल्या सामन्यात भारताने पाकिस्तानचा 9 विकेटने पराभव केला. गोलंदाजांच्या अप्रतिम कामगिरीनंतर भारतीय फलंदाजी पूर्ण लयीत दिसून आली.
या विजयात रोहित शर्मा आणि शिखर धवन या भारताच्या सलामीवीर फलंदाजांनी शतके करत महत्त्वाची कामगिरी केली. रोहित आणि शिखरने मिळून पहिल्या विकेटसाठी 210 धावांची द्विशतकी भागीदारीही रचली. ही भागिदारी दुबईतील दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावरील पहिल्या विकेटसाठी सर्वोच्च ठरली.
या आधी याच स्पर्धेत हॉंगकॉंगच्या निजाकत खान आणि अंशुमान राठ या सलामीच्या जोडीने 174 धावांची या मैदानावरील सर्वोच्च भागिदारी केली होती. त्यानंतर अवघ्या 5 दिवसांत हा विक्रम भारताने मोडला.
याच बरोबर रोहितने अजून एक विक्रम आपल्या नावावर केला. त्याने कर्णधार म्हणून दुबई आंतरराष्ट्रीय क्रिकेट मैदानावरील सर्वाधिक धावांची खेळी केली. या आधीचा विक्रम दक्षिण अफ्रिकेचा माजी कर्णधार ग्रॅम स्मिथच्या नावावर होता. त्याने 2010 मध्ये पाकिस्तानविरूद्ध खेळताना 92 धावांची खेळी केली होती.
रोहितची बांग्लादेशाविरूद्ध 21 सप्टेंबरला झालेल्या सामन्यातील नाबाद 83 धावांची खेळी ही या मैदानावरील कर्णधार म्हणून तिसऱ्या क्रमांकाची खेळी ठरली होती.
दुबईत कर्णधार म्हणून एका डावात सर्वाधिक धावा करणारे खेळाडू-
रोहित शर्मा (भारत) -111*
ग्रॅम स्मिथ-( दक्षिण अफ्रिका) 92
रोहित शर्मा(भारत) -83*
अॅलिस्टर कुक ( इंग्लड)- 80
अंशुमन राठ (हॉंगकॉंग)- 73
महत्वाच्या बातम्या –
–एशिया कप २०१८: ४ दिवसांत पाकिस्तानचा टीम इंडियाकडून दोनदा दारुण पराभव
–…आणि पाकिस्तानचे चाहते जोरदार भडकले
-पृथ्वी शॉ, श्रेयस अय्यरने रेल्वेला धु-धु धुतले, मुंबईचा ४०० धावांचा डोंगर