ऑस्ट्रेलियन संघाने नागपूर कसोटीच्या तिसऱ्याच दिवशी गुडघे टेकले आणि भारताने मोठा विजय मिळवला. बॉर्डर गावसकर ट्रॉफी 2023 चा हा पहिला सामना असून ऑस्ट्रेलियाने एक डाव आणि 132 धावांच्या अंतराने पराभव स्वीकारला. उभय संघांतील या सामन्यात खेळपट्टी फिरकी गोलंदाजांसाठी अनुकूल असल्याचे पाहायला मिलाले. याच कारणास्तव ऑस्ट्रेलियन संघ दोन्ही डावांमध्ये स्वस्तात सर्वबाद झाला. भारतीय कर्णधार रोहित शर्मा याने नागपूर कसोटीच्या खेळपट्टीविषयी पहिल्यांदाच प्रतिक्रिया दिली.
नागपूरमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात (Nagpur Test) ऑस्ट्रेलियान संघाने पहिल्या डावात 177 धावा केल्या. तर दुसऱ्या डावात त्यांचा संघ अवघ्या 91 धावा करून सर्वबाद झाला. सामना गमावल्यानंतर आणि हा सामना सुरू होण्यापूर्वी ऑस्ट्रेलियान संघ आणि त्यांचे माजी दिग्गज खेळाडू भारतीय खेळपट्टीविषयी नाराजी व्यक्त करू लागले होते. माध्यमांमध्ये हा विषयी मागच्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. अशातच आता पहिला कसोटी सामना जिंकणारा भारतीय कर्णधार रोहित शर्मा (Rohit Sharma) याने ऑस्ट्रेलियावर निशाणा साधला आहे.
नागपूर स्टेडियमच्या खेळपट्टीवर रोहित शर्माची खास प्रतिक्रिया –
नागपूर कसोटी सामना जिंकल्यानंतर रोहित शर्मा याने बीसीसीआय टीव्हीसाठी रविचंद्रन अश्विनला मुलाखत दिली. विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमच्या या खेळपट्टीवर ऑस्ट्रेलिया संग पूर्णपणे अपयशी ठरला असला, तरी भारताने मात्र मोठी धावसंख्या उभी केली. याच पार्श्वभूमीवर अश्विनने रोहित शर्माला प्रश्न विचारला. “भारतीय संघ फलंदाजी करताना त्यांना याठिकाणी कुठलीच अडचण आल्याचे दिसले नाही. पण पाहुणा ऑस्ट्रेलिया संघ खेळपट्टीविषयी नाराजी व्यक्त करत आहे. याचे कारण काय?” असा प्रश्न अश्विनने रोहितला विचारला.
अश्विनच्या या प्रश्नावर रोहितने उत्तर दिले की, “भारतीय संघाही त्याच खेळपट्टीवर खेळला. पण आम्ही ड्रेसिंग रूममध्ये स्किलवर चर्चा केली. अशा खेळप्टीवर कसे खेळले पाहिजे, यावर चर्चा झाली. खेळपट्टीविषयी एवढी चर्चा का होत आहे, हे मला समजत नाहीये. हे निराशाजनक आहे की आणच्या स्किलविषयी कोणीच बोलत नाही.”
दरम्यान, उभय संघांतील या सामन्याचा एकंदरीत विचार केला, तर ऑस्ट्रेलियासाठी दोन्ही डावांमध्ये एकही फलंदाज अर्धशतक करू शकला नाही. दुसरीकडे भारतासाठी मात्र कर्णधार रोहित शर्माने (120) शतक ठोकले. अष्टपैलू रविंद्र जडेजा (70) आणि अक्षर पटेल () यांनीही संघासाठी अर्धशतक केले. असे असले तरी, खेळपट्टीवर फिरकीसाठी अनुकूल असल्याचे पाहायला मिळालेच. रविंद्र जडेजा याने संघासाठी पहिल्या डावात, तर रविचंद्रन अश्विनने दुसऱ्या डावात प्रत्येकी पाच-पाच विकेट्स घेतल्या. ऑस्ट्रेलियासाठी पदार्पण करताना टॉड मर्फी याने पहिल्याच डावात 7 विकेट्स घेतल्या.
महास्पोर्ट्सचा व्हॉट्सअप ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महास्पोर्ट्सचा टेलिग्राम ग्रूप जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा
महत्वाच्या बातम्या-
विश्वचषकाच्या पहिल्या सामन्यात भारत पाकिस्तानला धूळ चारणार का? जाणून घ्या आतापर्यंतची आकडेवारी काय सांगते
मोठी बातमी! अवघे काही तास शिल्लक असतानाच पुढे ढकलली SA टी20 फायनल